Lokmat Sakhi >Social Viral > 'तो ऐतिहासिक सामना पाहता आला नाही!'- मसाबा गुप्ता सांगतेय आयुष्यभराची खंत

'तो ऐतिहासिक सामना पाहता आला नाही!'- मसाबा गुप्ता सांगतेय आयुष्यभराची खंत

एका बाजूला वडील आणि दुसऱ्या बाजूला देश खेळताना पाहणे या ऐतिहासिक क्षणाला मुकल्याबद्दल वाटते वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 06:09 PM2021-12-25T18:09:44+5:302021-12-25T18:19:54+5:30

एका बाजूला वडील आणि दुसऱ्या बाजूला देश खेळताना पाहणे या ऐतिहासिक क्षणाला मुकल्याबद्दल वाटते वाईट

'I haven't seen that historic match!' - says Masaba Gupta | 'तो ऐतिहासिक सामना पाहता आला नाही!'- मसाबा गुप्ता सांगतेय आयुष्यभराची खंत

'तो ऐतिहासिक सामना पाहता आला नाही!'- मसाबा गुप्ता सांगतेय आयुष्यभराची खंत

Highlightsविवियन रिचर्डस आणि नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता प्रसिद्ध अभिनेत्री८३ चित्रपटाच्या निमित्ताने भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या

बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनी क्रिकेटवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या यशावर आधारीत हा चित्रपट म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक सुखद आठवणच म्हणावी लागेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेली वर्ल्ड कपचा अंतिम सामन्यावर आधारीत ८३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्डस हेही या सामन्यातील खेळाडूंपैकी एक होते. त्यांची मुलगी म्हणजे भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता. आपण हा महत्त्वपूर्ण सामना पाहू शकलो नाही याची खंत मसाबाने नुकतीच व्यक्त केली. मसाबाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ८

(Image : Google)
(Image : Google)
३ मध्ये झालेल्या सामन्याची एक क्लिप पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. भारताने हा सामना ४३ धावांनी जिंकला होता. आपल्या संघातील इतर खेळाडूंपेक्षा विवियन रिचर्ड्स यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. मात्र कपिल देवने घेतलेल्या एका कॅचने ते मैंदानावरुन बाहेर गेले. हा सामना न बघणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे मसाबाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी ६ वर्ष उशीरा जन्माला आले. नाहीतर एका बाजूला माझे वडील आणि दुसऱ्या बाजुला माझा देश असा एक महत्त्वाचा सामना मला पाहता आला असता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ८३ या चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला असून हा चित्रपट पाहण्यासाठी मी आतूर असल्याचेही मसाबा म्हणते. माझी आई नीना गुप्ता हिचाही या चित्रपटात सहभाग असून माझ्यासाठी हे एक वर्तुळ आहे. दिपिका पदुकोण, रणवीस सिंग, कबीर खान आणि या चित्रपटाच्या निर्मितीत असणाऱ्या सगळ्यांनाच मसाबा मनापासून शुभेच्छा देते. 

(Image : Google)
(Image : Google)

रणवीर सिंग याने कपिल देव यांची भूमिका केली असून रोमीची भूमिका दिपिका पदुकोण हिने साकारली आहे. हा काळ डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करण्यात दिग्दर्शक कबीर खान बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीय संघाने त्या काळात वर्ल्ड कप जिंकण्यासाठी घेतलेले कष्ट, प्रतिकूल परिस्थिती, खेळांडूंमध्ये असणारी जिद्द आणि अखेर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशात त्याना मिळणारा मान हा सगळा पट या सिनेमातून नेमकेपणाने उलग़डण्यात आला आहे. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: 'I haven't seen that historic match!' - says Masaba Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.