Lokmat Sakhi >Social Viral > ''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

Zheng Qinwen: चीनची टेनिसपटू झेंग किनवेनने (tennis) तिच्या पराभवानंतर व्यक्त केलेला संताप आणि पाळीवरचा (menstrual periods) राग पुन्हा एकदा प्रत्येक बाईचं दुखणं मांडणारा ठरला आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 02:19 PM2022-05-31T14:19:32+5:302022-05-31T14:19:57+5:30

Zheng Qinwen: चीनची टेनिसपटू झेंग किनवेनने (tennis) तिच्या पराभवानंतर व्यक्त केलेला संताप आणि पाळीवरचा (menstrual periods) राग पुन्हा एकदा प्रत्येक बाईचं दुखणं मांडणारा ठरला आहे..

"I lost because of my menstrual periods" said Chinese tennis player Zheng Qinwen. "If I were a man ... | ''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

''पाळी आली म्हणूनच मी हरले', चीनची टेनिसपटू झेंग किनवेनचा संताप, मी पुरुष असते तर...

Highlightsपाळीचं हे दुखणं दर महिन्याला वागवण्यापेक्षा मी पुरुष असते तर किती बरं झालं असतं... असं ती अतिशय दु:खात पण तेवढ्याच संतापात म्हणाली.

''का आपल्यालाच हा त्रास दिला असेल निसर्गाने...'', असं पाळीच्या त्रासाने आगतिक होऊन प्रत्येक स्त्री कधी ना कधी म्हणालेलीच असते. तसाच तर असतो तो त्रास. परीक्षा, महत्वाचं काम, इंटरव्ह्यू, ऑफिसमधली महत्त्वाची मिटिंग असं काहीही जेव्हा असतं, तेव्हा खरंच पाळी नकोशी  वाटते.. कारण त्या त्रासामुळे आपण  आपलं १०० टक्के देऊ शकत नाही आणि कुठेतरी कमी पडतो. असंच काहीसं झालं चीनची (China) टेनिसपटू झेंग किनवेन हिच्याबाबत. त्यामुळेच तर पाळीचं हे दुखणं दर महिन्याला वागवण्यापेक्षा मी पुरुष असते तर किती बरं झालं असतं... असं ती अतिशय दु:खात पण तेवढ्याच संतापात म्हणाली.

 

झेंगचं हे वाक्य बघता बघता सोशल मिडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. त्याचं झालं असं की १९ वर्षांची झेंग फ्रेंच ओपनमध्ये (French Open) खेळत होती. आघाडीची टेनिस पटू इगा स्वितेक हिच्यासोबत तिची मॅच सुरु होती. इगाला तगडी टक्कर देत तिने खेळाचा पहिला सेट जिंकला होता. त्यामुळे तिच्याकडून तिच्या स्वत:च्या आणि तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या होत्या. पण त्यानंतर तिला पाळी आली पोट दुखायला सुरुवात झाली. तब्बल ८२ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये जबरदस्त खेळी करणारी झेंग मात्र त्यामुळे ६- ० आणि ६- २ या फरकाने खेळाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये हरली. या पराभवामुळे तिला फ्रेंच ओपनमधून बाहेर पडावे लागले..

 

आपण चांगला खेळ करत होतो. पण पाळीचं दुखणं सुरु झालं आणि मग माझी पिछेहाट होत गेली अशी मनातली ठसठस झेंग व्यक्त करते आहे.. ती म्हणते की नेहमीच पाळीच्या पहिल्या दिवशी माझं खूप जास्त पोट दुखतं.. खेळतानाही तेच झालं. हे सगळं खूप कठीण आहे. त्यामुळेच तर वाटतं की हा सगळा त्रास सहन करण्यापेक्षा मी पुरुष असते तर किती बरं झालं असतं... मला या त्रासातून जावं तरी लागलं नसतं.. हे वाक्य झेंगच्या तोंडून आलं असलं तरी पाळी येणारी प्रत्येक जण कधी ना कधी या मानसिक अवस्थेतून गेलेलीच असते. म्हणूनच तर आज तिचं बोलणं हे प्रत्येकीलाच आपल्या मनातलं वाटतं आहे.. पराभवाचं खापर पाळीच्या नावावर फोडून ती मोकळी झाली, अशी टिकाही तिच्यावर होत आहेच.. पण 'बाईचं दुखणं बाईलाच माहिती...', हा आवाजही अगदी स्पष्टपणे तिच्यामागे उभा आहे.. 


 

Web Title: "I lost because of my menstrual periods" said Chinese tennis player Zheng Qinwen. "If I were a man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.