Lokmat Sakhi >Social Viral > '30 सेकंदाच्या आत मी तिथून पळाले'; नुसरत भरूचानं सांगितला दिल्लीच्या 'त्या' हॉटेलमधला भीतीदायक अनुभव

'30 सेकंदाच्या आत मी तिथून पळाले'; नुसरत भरूचानं सांगितला दिल्लीच्या 'त्या' हॉटेलमधला भीतीदायक अनुभव

Nushrratt bharuccha recalls her paranormal experience : विश्रांतीसाठी ती रात्रभर एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी असं काही होईल याची तिनं कल्पनाही केली नव्हती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:49 IST2021-11-30T15:32:22+5:302021-11-30T15:49:00+5:30

Nushrratt bharuccha recalls her paranormal experience : विश्रांतीसाठी ती रात्रभर एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी असं काही होईल याची तिनं कल्पनाही केली नव्हती. 

I ran for my life nushrratt bharuccha recalls her paranormal experience at a delhi hotel | '30 सेकंदाच्या आत मी तिथून पळाले'; नुसरत भरूचानं सांगितला दिल्लीच्या 'त्या' हॉटेलमधला भीतीदायक अनुभव

'30 सेकंदाच्या आत मी तिथून पळाले'; नुसरत भरूचानं सांगितला दिल्लीच्या 'त्या' हॉटेलमधला भीतीदायक अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या विशाल फुरिया दिग्दर्शित तिचा नवीन चित्रपट 'छोरी'चे प्रमोशन करत आहे. चित्रपटात,  नुसरत भरुच्चाने एका आठ महिन्यांच्या गरोदर स्त्री साक्षीची भूमिका केली आहे, जिला तिच्या पतीसह, एका निर्जन गावात एका निर्जन घरात आश्रय घेण्यास भाग पाडले जाते जिथे तिला विचित्र प्रसंगांचा सामना करावा लागतो. 

ETimes शी संवाद साधताना, नुसरतने शुटिंगदरम्यान रात्रीच्यावेळी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असतानाचा एक थरारक अनुभव सांगितला. विश्रांतीसाठी ती रात्रभर एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी असं काही होईल याची तिनं कल्पनाही केली नव्हती. 

नुसरतनं दिलेल्या माहितीनुसार तिनं हॉटेलच्या रूममध्ये टेबलावर आपली सुटकेस उघडून ठेवली होती. तर ती सुटकेस तिला उघडलेल्या अवस्थेत जमिनीवर व्यवस्थित ठेवलेली दिसली. हे इतक्या सहज घडणारे नव्हते. तिथे काहीतरी असामान्य कृती घडत असल्याचं तिला जाणवलं.  भयभीत होऊन ती ३० सेकंदाच्या आत जीव मुठीत घेऊन हॉटेलच्या बाहेर पळाली. हे सगळं भयानक असल्याचं तिनं सांगितलं. 

दरम्यान, 'छोरी' हा 2017 ला गाजलेल्या मराठी हॉरर लपाछपीचा चित्रपटाचा रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन फुरिया यांनी  केले आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. यात साक्षीचा रहस्यमय दुष्ट शक्तींशी लढाईचा इतिहास आहे, जे तिच्या आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या मागे आहेत. आपल्या न जन्मलेल्या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्त्रीला संघर्षाच्या खोलवर जावे लागते. कारण तिच्या कुटुंबातील ३ मुलं राक्षसांच्या प्रभावाखाली असतात. 

नुसरत भरूचाला प्यार का पंचनामा २मधून खूप लोकप्रियता मिळाली होती.  सोनू के टीटू की स्वीटीमधील नुसरतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. इंस्टाग्रामवर नुसरत भरुचाचे ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.  सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो ती नेहमीच चाहत्यांसह शेअर करत असते. 

Web Title: I ran for my life nushrratt bharuccha recalls her paranormal experience at a delhi hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.