Lokmat Sakhi >Social Viral > IAS मिनिस्ती. एस .म्हणतात, अधिकारी आपली पॉवर नक्की कशासाठी वापरतात? भलं कुणाचं करतात..

IAS मिनिस्ती. एस .म्हणतात, अधिकारी आपली पॉवर नक्की कशासाठी वापरतात? भलं कुणाचं करतात..

IAS Ministiy Shares Her Experience : अधिकारी म्हणून काम करताना हाती असलेली सत्ता वापरायची कशी हे अधिकाऱ्यांच्याच हातात असतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 17:32 IST2025-01-07T17:29:22+5:302025-01-07T17:32:10+5:30

IAS Ministiy Shares Her Experience : अधिकारी म्हणून काम करताना हाती असलेली सत्ता वापरायची कशी हे अधिकाऱ्यांच्याच हातात असतं.

IAS Ministiy Shares Her Experience | IAS मिनिस्ती. एस .म्हणतात, अधिकारी आपली पॉवर नक्की कशासाठी वापरतात? भलं कुणाचं करतात..

IAS मिनिस्ती. एस .म्हणतात, अधिकारी आपली पॉवर नक्की कशासाठी वापरतात? भलं कुणाचं करतात..

भारतात आता महिलासरकारी अधिकारीआपल्या मेहनतीवर व कर्तृत्वावर या मोठमोठी पदे सांभाळतात. (IAS Ministiy Shares Her Experience )असेच एक नाव म्हणजे मिनिस्ती.एस. त्या लखनऊस्थित एक आयएएस अधिकारी आहेत. मुळच्या केरळच्या.  भाषाशास्त्रतज्ज्ञ आहेत. प्रशासनात काम करताना येणारी आव्हानं आणि त्यातून आपलं काम करण्याचं धैर्य कसं येतं याविषयी त्या फार नेमकं काही सांगतात.(IAS Ministiy Shares Her Experience ) सुशासन द पॉडकास्ट या चॅनलशी संवाद साधताना त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. 

मिनिस्ती.एस. सांगतात, एका पोलिस ठाण्याला भेट देत असताना अचानक आरडाओरडा ऐकू आला. नक्की काय चालले आहे बघायला गेलो तर एका गरोदर बाईला पोलिस हाकलत असताना दिसले. पोलीस म्हणत होते, "कशाला सारखी येतेस, चालती हो."मी तिला आत बोलावले, तिचा कदाचित आठवा महिना चालू असावा. अशा अवस्थेत तिने माझ्या पायांवर लोटांगण घातले.(IAS Ministiy Shares Her Experience ) मी पटकन तिला उठवून खुर्चीवर बसवले. ती म्हणाली, "माझ्या २ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. त्याला सोडवून आणा. इथे मी २० ते ३० वेळा आले पण कोणी माझं म्हणणं ऐकून घेत नाही.  कोणी अपहरण केले आहे, ते सुद्धा माहिती आहे, फक्त मुलाला सोडवा.

मी सर्व प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा एक कर्मचारी म्हणाला, "ती एका अशा जमातीची बाई आहे जिथे सर्व गुंड व गुन्हेगार राहतात. तिचा नवरा आता तुरूंगात आहे. तिच्या नवऱ्याच्या मित्रानेचं मुलगा पळवला आहे. त्यांची आपसात भांडणं होती. तो आता बिहारमध्ये आहे." सर्वप्रकार ऐकल्यावर मी त्याला विचारले, "एक आई तिच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार करत आहे, त्याला सोडवणे तुमचे काम आहे ना?" या प्रश्नाचे समोरून उत्तर हो असे आले. लवकरात लवकर कारवाई करा नाही तर मी तुमच्यावर कारवाई करीन असं सांगितल्यावर ते कामाला लागले. आणि त्या बाईंचा मुलगा सापडला.’

हा अनुभव सांगून मिनिस्ती म्हणतात, अधिकाऱ्यांना हे माहिती हवं की आपल्याकडे पदाची मोठी ताकद आहे. त्या अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी करणं आपल्या हातात आहे. एखादा जर करत नसेल तर त्याला देखील करायला लावणं आपली जबाबदारी असते.

Web Title: IAS Ministiy Shares Her Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.