Lokmat Sakhi >Social Viral > 'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट

'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट

IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday : नोकरी माणसांचं काय करते हे सांगणारी एक ओळ एका आयएएस अधिकाऱ्याने पोस्ट म्हणून लिहिली, आणि लोकांना आठवली आपली गावं, आपली माणसं, नोकरीतली हतबलताही..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 02:09 PM2022-07-22T14:09:28+5:302022-07-22T15:03:56+5:30

IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday : नोकरी माणसांचं काय करते हे सांगणारी एक ओळ एका आयएएस अधिकाऱ्याने पोस्ट म्हणून लिहिली, आणि लोकांना आठवली आपली गावं, आपली माणसं, नोकरीतली हतबलताही..

IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday it touched the hearts of thousands of peopleIas officer dr sumita misra wrote about the holiday it touched the thousands of people hearts | 'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट

'स्वत:च्या घरी जायचं तरी, इतरांची परवानगी घ्यावी लागते! ' - महिला IAS ऑफिसरची हृदयस्पर्शी पोस्ट

केवळ सेलिब्रिटी किंवा राजकारणीच नाही तर आयएएस अधिकारीही सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असतात. ते आपल्या फॉलोअर्ससोबत प्रेरणादायी व्हिडिओ, फोटो आणि पोस्ट शेअर करत असतात. आजच्या युगात तरूण मुलं सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांना अशा लोकांना फॉलो करायला आवडते जे त्यांचे प्रेरणा स्त्रोत आहेत. (IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday) त्यापैकीच एक या महिला अधिकारी. त्यांची एका ओळीची पोस्ट वाचून अनेकजण इमोशनल झाले. (IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday it touched the hearts of thousands of peopleIas officer dr sumita misra wrote about the holiday it touched the thousands of people hearts)

आयएएस अधिकारी डॉ. सुमिता मिश्रा, ज्या अनेकदा प्रेरणादायी व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करतात, त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ओळ लिहिली, जी वाचल्यानंतर हजारो लोकांनी आपल्या जीवनाशी या ओळी रिलेट केल्या आहेत. हरियाणाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुमिता मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटवर लिहिले की, 'अशा वळणावर नोकरी घेऊन येते.  स्वतःच्या घरी जाण्यासाठी इतरांची परवानगी घ्यावी लागते. ' आतापर्यंत 48 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे, तर सुमारे 5000 लोकांनी रिट्विट केले आहे.

नोकरी करताना रजा न मिळणं हे तसं कॉमनच. त्यात बॉसनं रजा नाकारणं, घरी काही महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आपण कार्यालयात येणं. आता तर अगदी स्वत:च्या लग्नातही ऑनलाइन काम करणारे वर्क फ्रॉम होमवाले दिसतात.

लेकाच्या नकळत विमानात जाऊन आईनं गोड सरप्राईज दिलं; आईला पाहताच पायलटला भरून आलं

रजा न मिळाल्याची हताशा सांगणारं ते ट्विट वाचल्यावर ट्विट वाचल्यानंतर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ' बरोबरच आहे तुमचं. या नोकरीमुळे तुम्ही कुटुंबापासून दूर जाऊ लागले आहात. आयुष्य कुठे चालले आहे तेच कळत नाही. नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला आहे, मग तो छोटा असो वा मोठा! किमान कुटुंब तरी एकत्र असते.' दुसऱ्या  यूजरने लिहिले ‘व्यवसाय हा योग्य पर्याय आहे, स्वातंत्र्य, पैसा, आदर देखील येथे मिळते.’
रजा न मिळणं, आपण बांधले गेलो आहोत असं वाटण्याची अनेकांची हतबल भावना त्या पोस्टशी रिलेट करती झाली.
 

Web Title: IAS officer Dr Sumita Misra wrote about the holiday it touched the hearts of thousands of peopleIas officer dr sumita misra wrote about the holiday it touched the thousands of people hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.