"कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा असली की, वयाचे बंधन आड येत नाही",असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या मनात ती गोष्ट करण्याची मनापासून इच्छा हवीच... असे असले की ती गोष्ट आपण सहज साध्य करु शकतो. माणूस हा आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतो. काहीजण असे असतात जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहेनत आणि प्रामाणिकपणा दाखवतात. आत्तापर्यंत आपण सोशल मीडियावर अनेक महिलांच्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याच्या प्रेरक कथा ऐकल्याचं असतील. या अशा प्रकारच्या व्हायरल प्रेरक कथा ऐकून आपल्याला देखील प्रेरणा मिळते. अशीच काहीशी गोष्ट आहे तामिळनाडूच्या वीरम्मल अम्माची...
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू (IAS officer Supriya Sahu) यांनी तामिळनाडूमधील मदुराई येथे राहणाऱ्या ८९ वर्षीय वृद्ध वीरम्मल अम्मा (Veerammal Amma)यांची प्रेरणादायी कथा ट्विटरवर पोस्ट केली आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी वृद्ध वीरम्मल अम्मा यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भारावून गेले आहेत तसेच वीरम्मल अम्मा यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, आयएएस अधिकारी वीरम्मल अम्माला (Veerammal Amma) तिच्या 'फिटनेस आणि सकारात्मक दृष्टिकोन' (IAS officer asks 89-year-old Panchayat President her secret to fitness, she says) याबद्दल रहस्य विचारतात. त्यांच्या या प्रतिसादाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे(IAS Officer's Post About 89-Year-Old Panchayat President Veerammal Amma Is Inspiring).
सुप्रिया साहू वीरम्मल अम्मा विषयी काय सांगतात...
पोस्टच्या कॅप्शनमध्ये IAS सुप्रिया साहू (IAS officer Supriya Sahu) यांनी लिहिले आहे की, "वीरम्मल अम्मा, मदुराईमध्ये 'अरिट्टापट्टी पाटी' या नावाने प्रसिद्ध आहेत. अरिट्टापट्टी पंचायतीच्या ८९ वर्षीय वृद्ध वीरम्मल अम्मा पंचायत अध्यक्षा (Meet India's oldest panchayat president, talks about secret of her fitness) आहेत. त्या खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी महिला आहेत. त्या ८९ वर्षीय वृद्ध असूनही आजही या वयात फिट व तंदुरुस्त आहेत. तिच्याविषयी अधिक सांगताना IAS सुप्रिया साहू म्हणतात, तिचे हास्य आणि अफाट उत्साह खूप हृदयस्पर्शी आहे."
सुप्रिया साहू पुढे म्हणाल्या, "जेव्हा मी वीरम्मल अम्माला तिच्या तंदुरुस्तीचे आणि सकारात्मक वृत्तीचे रहस्य विचारले, तेव्हा ती म्हणाली की, मी फिट राहण्यासाठी बाजरी सारख्या धान्यापासून बनवलेले घरगुती पारंपारिक जेवण खाण्याला प्राधान्य देते. तसेच दिवसभर मी माझ्या शेतीच्या क्षेत्रात काम करते. वीरम्मल अम्माला भेटल्यानंतर सुप्रिया साहू म्हंणतात, तिला भेटणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. मदुराई , तमिळनाडू मधील पहिले जैवविविधता वारसा स्थळ असलेल्या अरिट्टापट्टीच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांवर तिच्याशी चर्चा करण्यात खूपच आनंद झाला.
घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?
Veerammal Amma, popularly known as "Arittapatti Paati' the 89 years old Panchayat President of Arittapatti Panchayat is truly an inspiring woman. Fit as a fiddle she is the oldest Panchayat President in TN. Her infectious smile & unbridled enthusiasm is so heatwarming. When I… pic.twitter.com/ol7M2tpqIr
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) August 30, 2023
गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण..
वीरम्मल अम्मा विषयी नेटकरी म्हणतात...
ही पोस्ट एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट शेअर केल्यापासून २७,००० पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे. त्याचबरोबर या पोस्टला जवळपास १,००० पेक्षा जास्त लाईक्स देखील आले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी पोस्टच्या कमेंटसमध्ये जाऊन त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये विचारले, "सुपर. तुम्ही चहा पिता का असे विचारल्यावर तिने काय उत्तर दिले ? ती चहा पिते का ?" यावर आयएएस सुप्रिया साहू यांनी उत्तर दिले, "हो, ती चहा पिते आणि तो ही चक्क साखरेचा." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की, "वीरम्मल अम्मा यांना त्यांच्या अथक आणि निडर प्रयत्नांबद्दल विशेष सलाम. देव त्यांना पुढे काम करण्यासाठी खूप धैर्य आणि शक्ती देवो." काहींनी वीरम्मल अम्माचे राहणीमान पाहून "साधी राहणी हेच सर्वोत्तम जगणे आहे, असे म्हणत तिचे कौतुक केले आहे. "तिच्याबद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्या पोस्टद्वारे तिला ओळखणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे." "ती किती प्रेरणादायी महिला आहे. तिची कथा आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद." अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टला देत वीरम्मल अम्मावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.