Join us  

दिल्लीकरांनो आता बस्स!! इडलीसोबत केलेला 'हा' भयंकर प्रकार पाहून इडलीप्रेमी चिडले, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 12:28 PM

Viral Video Of Idli Burger: इडलीसोबत तुम्ही करत असणारे वेगवेगळे विचित्र भयंकर प्रयोग थांबवा.... अशी कडक सूचना इडलीप्रेमींनी दिल्लीकरांना दिली आहे. बघा व्हायरल व्हिडिओ.... (idli lovers get angry on delhi food stall)

ठळक मुद्देइडलीवर वेगवेगळे पदार्थ टाकून तो खवय्यांना इडली बर्गर नावाने खाऊ घातला जात आहे. 

इडली हा आता केवळ दक्षिण भारतीय लोकांपुरताच मर्यादित राहिलेला पदार्थ नाही. जगभरात इडलीचे चाहते आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून इडलीचा वापर करून जे काही वेगवेगळे पदार्थ केले जात आहेत, ते पाहून सगळेच इडलीप्रेमी आणि खासकरून दक्षिण भारतीय इडली प्रेमी मात्र चांगलेच चिडले आहेत. मागे पावभाजी डोसा हा एक खूप वेगळाच पदार्थ सोशल मिडियावर व्हायरल झाला हाेता. तो प्रकार पाहूनच अनेक डोसाप्रेमी वैतागले होते. त्यात आता पुन्हा एकदा इडली बर्गर नावाचा पदार्थ गाजतो आहे (viral video of idli burger). यामध्ये इडलीवर वेगवेगळे पदार्थ टाकून तो खवय्यांना इडली बर्गर नावाने खाऊ घातला जात आहे. 

 

इडली बर्गर हा भलताच पदार्थ दिल्लीमधे मिळणाऱ्या एका फूड स्टॉलवर तयार होत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या dhirappan या इन्स्टाग्राम पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. गंमत अशी आहे की इडली किंवा डोसा यांच्यासोबत जे काही वेगवेगळे विचित्र प्रयोग होत आहेत, ते सगळे दिल्लीतच केले जात आहेत.

स्वयंपाकासाठी ओट्याजवळ उभं राहताच घामाघूम होता? ५ सोपे उपाय- मुळीच घाम येणार नाही

त्यामुळे इडली- डोसा प्रेमी दिल्लीकरांवर विशेष चिडले असून दिल्लीकरांनो आता तरी इडलीसोबतचे प्रयोग थांबवा नाहीतर तुमचे छोले- भटुरे आम्ही सांबारमध्ये बुडवून खाऊ अशी मजेशीर धमकी अनेक जणांनी त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये केली आहे.

 

व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की सुरुवातीला त्या शेफने एक मोठ्या आकाराची इडली मधोमध कापली. त्यावर बटर, चीज आणि अनेक वेगवेगळे पदार्थ, भाज्या, चटण्या टाकल्या आणि ती इडली पॅनवर खमंग भाजून घेतली.

नाश्त्यासाठी रोज काय करावं प्रश्नच पडतो? ७ हेल्दी- चटपटीत पदार्थ, झटपट होतील सगळ्यांना आवडतील

त्यानंतर इडलीचे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवले. त्यावरून पुन्हा वेगवेगळे पदार्थ टाकले आणि अशा पद्धतीने तयार झालेलं हे इडली बर्गर नारळाची चटणी, सांबार यांच्यासोबत सर्व्ह केलं. 'Justice for idly and dose', 'Please leave our food alone', 'Naan ko coconut chutney me dubake khunga', 'Take him to south India jail' अशा प्रकारच्या अनेक कमेंट त्या व्हिडिओला आल्या आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नदिल्लीसोशल मीडियाइन्स्टाग्राम