मुलांना अमूक खायला घाला, तमूकमुळे पोषण होते. उंची वाढते, पोट बिघडते, बुद्धी वाढते किती प्रकारे विचार करतात पालक मुलांच्या खाण्यापिण्याचा. तरी मुलं वाट्टेल ते तोंडात घालतात. काहीही खातात, जंक फूड मागतात. घरचं नको. भाज्या नको अशा पालकांच्या अनेक तक्रारी असतात. पण हे सारं सोडून आपलं मुलं घरातले सोफे, भिंती, खुर्च्या, चपला खाऊ लागले तर? तो आजार म्हणावा की सवय? अशीच एक समस्या एका आईच्या वाट्याला आली आहे.
ब्रिटनमधील वेल्स येथील ब्लॅकवूड शहरात राहणारी स्टेसी एहेर्न. ती २५ वर्षांची तिला दोन मुली आहे. एक मुलगी तीन वर्षांची तर दुसरी वर्षभराची आहे. विंटर ही स्टेसीची मोठी मुलगी. स्टेसी भिंतींचे प्लास्टर, सोफ्याचा स्पंज, फोटोफ्रेम, काचा असे वाट्टेल ते खाते. नुकताच आणलेला सोफा तिने कुरतडला आणि त्यातला फोम खाल्ला.
(Image : google)
सांगून ऐकतच नाही म्हणून शेवटी आईने मुलीला डॉक्टरकडे नेले. तर त्यांनी या मुलीला पिका नावाची एक डिसऑर्डर आजार असल्याचे सांगितले. जसं मुलं तोंडात बोटं घालतात, वस्तू घालतात. नंतर ते बंद होतं. पण या त्रासात मुलांना असं काही विचित्र खावंसंही वाटतं. आणि त्यांचा स्वत:वर काबू राहत नाही. दिवसरात्र या मुलांची काळजी घ्यावी लागते.
माती, सिमेंट, लाकडाच्या वस्तल असं काहीही खाण्याची इच्छा या आजारात होते. या आजाराविषयी संशोधन सुरु आहे. मात्र त्यावर इलाज काय, मोठं झाल्यावर ती बरी होईल का हे मात्र कुणीही सांगू शकत नाही.