Lokmat Sakhi >Social Viral > साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

साडी नेसली की मोबाईल, रूमाल, चाव्या अशा अनेक वस्तू ठेवण्यासाठी पर्स घ्यावीच लागते ना? आता हे टेन्शन सोडा आणि सरळ खिसा असणारीच साडी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 06:22 PM2021-11-14T18:22:37+5:302021-11-14T18:27:58+5:30

साडी नेसली की मोबाईल, रूमाल, चाव्या अशा अनेक वस्तू ठेवण्यासाठी पर्स घ्यावीच लागते ना? आता हे टेन्शन सोडा आणि सरळ खिसा असणारीच साडी घ्या...

If the sari had a pocket! Fun, take this sari with pocket, no hassle of handling the purse .. | साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

साडीला खिसा असता तर! मज्जा, ही घ्या खिसा असलेली साडी, पर्स सांभाळायची कटकट नाही..

Highlightsमस्त खिसेवाली साडी मिळाली तर वेगवेगळ्या वस्तू बाळगण्याचं आपलं टेन्शन एका झटक्यात दूर होईल.

इतर कोणत्याही कपड्यापेक्षा साडीत आपण खूप छान दिसतो, हे आपल्याला माहिती असतं. पण तरीही आपण साडी नेसणं टाळतो. यासाठी अनेक कारण असतात. जसं की साडी नेसल्यावर आपल्याला कंफर्टेबल वाटत नाही. साडीमध्ये पटापट कामं करता येत नाहीत किंवा सुचत नाहीत, साडी नेसल्यावर खूप अवघडल्यासारखं.. वगैरे... वगैरे.. अशी प्रत्येकीची साडी नेसणं टाळण्याची लिस्ट वेगवेगळी असते. पण या सगळ्यात एक कॉमन कारणही असतं बरं का... आणि ते म्हणजे आधीच साडी नेसून खूप अवघडल्यासारखं होतं आणि त्यात हातात पर्सचं ओझं सांभाळावं लागतं. साडी आणि पर्स एकाचवेळी मॅनेज करणं होत नसल्याने तुम्हीही साडी नेसणं टाळत असाल, तर आता ही चिंता सोडा आणि चक्क खिसा असणारी साडीच विकत घ्या...

 

आजकाल मुलीही सर्रास जीन्स घालतात. जीन्सला खिसे असल्याने जीन्स घातल्यावर पैसे, रूमाल, चाव्या या सगळ्या वस्तू सांभाळण्यासाठी पर्स घेण्याची मुळीच गरज नसते. आजकाल तर प्लाजो किंवा कुर्ती, सलवार यांना सुद्धा खिसे असतात. त्यामुळे हातातल्या सगळ्या वस्तू आरामात खिशात जातात आणि हात इतर कामं करण्यासाठी मोकळे असतात. आता हातांचा हा मोकळेपणा तुम्हाला साडीतही अनुभवता येणार आहे. खिसा असणारी साडी हा नवाच ट्रेण्ड सध्या येऊ पाहत असून तरूणींप्रमाणेच वयस्कर महिलांमध्येही तो कमालीचा हिट होईल, यात शंकाच नाही. 

माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

 

 

तुम्हाला मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे माहिती आहे ना... हो तीच ती... 'तुला पाहते रे..' या मालिकेत 'मायरा'ची भुमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री. तेजाज्ञा म्हणजेच Tejadnyaa या ब्रॅण्डची साडी नेसून तिने नुकतेच एक फोटो शूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अभिज्ञाने जी साडी नेसली आहे, त्या साडीला चक्क एक खिसा आहे. साडीचा खिसा पाहून तर असे नक्कीच वाटते की आपला बऱ्यापैकी मोठा असणारा मोबाईल देखील या खिशात अगदी आरामात मावू शकतो. जर अशी मस्त खिसेवाली साडी मिळाली तर वेगवेगळ्या वस्तू बाळगण्याचं आपलं टेन्शन एका झटक्यात दूर होईल.

 

ही साडी लिनन प्रकारातली असून पुर्णपणे प्लेन आहे. निळ्या रंगाच्या या साडीचे ब्लाऊज प्रिंटेड प्रकारातले आहे. साडी नेसल्यावर आपल्या डाव्या हाताला येईल असा एक खिसा या साडीला असून तो ही प्रिंटेड आहे आणि त्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ही साडी रेडी टू वेअर या प्रकारातली आहे. म्हणजे आपली लहानपणीची कल्पना साडी आठवते ना? अगदी तशीच. म्हणजे फक्त परकर घातल्यासारखी घालायची आणि साडीचा बंद बांधून पदर हवा तसा घ्यायचा. नेसायला अशी सोपी साडी आणि साडीला खिसा म्हणजे तर काय मज्जाच... या साडीची किंमतही जरा वजनदार आहे बरं का.... साईटवर या साडीची किंमत ६ हजार रूपये एवढी सांगितली असून इतर ऑनलाईन शॉपिंग साईटवर वेगवेगळ्या किमतीतल्या अशा पॉकेटवाल्या साड्या नक्कीच बघायला मिळतील. 
 

Web Title: If the sari had a pocket! Fun, take this sari with pocket, no hassle of handling the purse ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.