Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाकाचा पदार्थ करपला, भांडं जळालं तर ते घासणार कसं? ५ टिप्स, जळकं भांडंही झटपट होईल स्वच्छ

स्वयंपाकाचा पदार्थ करपला, भांडं जळालं तर ते घासणार कसं? ५ टिप्स, जळकं भांडंही झटपट होईल स्वच्छ

5 Ingredients to Clean Tough Burn Stains From Utensils : पदार्थ खाली लागला किंवा जळाला तर भांडं घासणं फार अवघड होतं, त्यासाठी हे सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 12:55 PM2022-12-09T12:55:06+5:302022-12-09T13:03:59+5:30

5 Ingredients to Clean Tough Burn Stains From Utensils : पदार्थ खाली लागला किंवा जळाला तर भांडं घासणं फार अवघड होतं, त्यासाठी हे सोपे उपाय.

If the cooking material gets burnt, how can you wash it? 5 tips, even the burning pot will be clean | स्वयंपाकाचा पदार्थ करपला, भांडं जळालं तर ते घासणार कसं? ५ टिप्स, जळकं भांडंही झटपट होईल स्वच्छ

स्वयंपाकाचा पदार्थ करपला, भांडं जळालं तर ते घासणार कसं? ५ टिप्स, जळकं भांडंही झटपट होईल स्वच्छ

बऱ्याचदा इतर कामांच्या गडबडीत आपण गॅसवर काही ठेवलं आहे याचा विसर पडतो. जेव्हा लक्षात येत तेव्हा भांडं करपून काळं पडलेलं असत. मग ही करपलेली भांडी स्वच्छ कशी करावी हा मोठा प्रश्न उभा राहतो. अशी भांडी साध्या साबणाने व स्क्रबरने स्वच्छ करता येत नाहीत.  भांडी घासून घासून हात दुखू लागला तरी भांडी काही स्वच्छ होत नाहीत. त्यासाठीच या काही टिप्स, काम होईल सोपं. (5 Ingredients to Clean Tough Burn Stains From Utensils).

१. बेकिंग सोडा - किचनमधील करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. बेकिंग सोडा व पाणी यांची एकत्रित पेस्ट करून त्याने भांडी घासावी. यामुळे करपलेली भांडी स्वच्छ होतात. 

२. व्हिनेगर - भांड्यांच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगर हा देखील एक उत्तम पर्याय आहे. जळलेल्या भांड्यामधे काही वेळ व्हिनेगर घालून ठेवा. मग त्यात गरम पाणी आणि डिशवॉश घालून हे भांडे स्वच्छ घासून घ्या. 

३. लिंबाचा रस - खरंतर पूर्वीपासून भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि राख यांचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी भांडे करपले आहे तिथे लिंबाचे साल घासावे. लिंबात असणाऱ्या अ‍ॅसिडमुळे काळे डाग लगेच स्वच्छ होतात.

४. मीठ - करपलेल्या भांड्यात जाड मीठ पसरवून घाला व त्यात पाणी ओतून ते चांगलं उकळवून घ्या. नंतर घासणी व साबणाच्या मदतीने हे भांड स्वच्छ करा. 

५. टोमॅटो सॉस - टोमॅटो सॉसच्या मदतीने करपलेले भांडे आपण पुन्हा एकदा चमकवू शकतो. करपलेल्या भांड्यावर टोमॅटो सॉस लावा व रात्रभर ते भांडे तसेच ठेवून द्या. सकाळी स्क्रबर आणि साबणाच्या मदतीने हे भांडे स्वच्छ धुवून घ्यावे.

 

Web Title: If the cooking material gets burnt, how can you wash it? 5 tips, even the burning pot will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.