Join us  

दिवंगत वडिलांचा फोटो हातात आणि आजोबांचं बोट धरुन नवरी आली मंडपात.. पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 11:37 AM

Bride Viral Emotional Video : वडीलांच्या आठवणीनं भावूक झालेल्या नवरीचा हा व्हिडिओ काळजाला भिडणारा आहे.

वडिलांशिवाय जगाची कल्पनाही करू शकत नाही. वडील असतील तर मुलांची सर्व स्वप्ने पूर्ण होतात. असे म्हणतात की, बाप सर्व कष्ट घेऊन आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतो. ज्यांना बाप नाही त्यांना किती वाईट वाटत असेल विचार करा. सोशल मीडियावर एक अतिशय भावूक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या वडिलांचा फोटो घेऊन मंडपात येत असल्याचे दिसून येते. ती  आजोबांसोबत येत आहेत. वडीलांच्या आठवणीनं भावूक झालेल्या नवरीचा हा व्हिडिओ काळजाला भिडणारा आहे. (If the father is not there then the bride cried holding the grandfathers hand in the marriage you will also become emotional after watching the video)

व्हायरल व्हिडिओमध्ये एक नववधू आपल्या वडिलांची आठवण काढून कशी रडत आहे हे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांना रडवतोय. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक भावूक होत आहेत. लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर कमेंट करत आहेत.

हा व्हिडिओ priyankabhati169 नावाच्या इंस्टाग्राम यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक लोकांचे लाइक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले - वडिलांशिवाय जग शून्य आहे. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने कमेंट करताना लिहिले आहे - तुम्ही धैर्यवान आहात. देव तुम्हाला सर्व सुख देवो.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया