Join us  

चिलटं, डास-झुरळांनी उच्छाद मांडलाय? बेकिंग सोड्याचा 'करा' जबरदस्त उपाय; किडे होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 12:56 PM

If you do this, flies, mosquitoes and cockroaches will disappear from your home! : मच्छर आणि झुरळांना पळवून लावणारा घरगुती सोपा उपाय

पावसाळा सुरु झाला, की घरात मच्छर आणि झुरळं उच्छाद मांडतात (Cockroaches). मच्छर आणि झुरळांमुळे घरात रोगराई पसरते. बऱ्याचदा किचनमध्ये झुरळांचा वावर वाढतो. भाज्या आणि अन्नावर जाऊन फिरतात (Mosquitoes). ज्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. शिवाय पावसाच्या पाण्यामुळे घरात चिलटं, डास येतात (Cleaning Tips). डासांच्या चाव्यामुळे इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो (Social Viral). यावर उपाय म्हणून आपण बाजारातून केमिकल प्रॉडक्ट आणून त्याचा वापर करतो. पण याचे देखील काही साईड इफेक्ट्स आहेत.

जर घरात छोटी छोटी चिलटं, डास घोंघावत असतील, शिवाय किचनमध्ये झुरळांचाही वावर वाढला असेल तर, बेकिंग सोड्याचा 'या' पद्धतीने वापर करा. यामुळे डास आणि झुरळं पुन्हा घरात शिरणार नाहीत. कोणता आहे हा उपाय? पाहूयात(If you do this, flies, mosquitoes and cockroaches will disappear from your home!).

डास आणि झुरळांना पळवून लावणारा उपाय

लागणारं साहित्य

लवंग

झुरळं

योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

पाणी

तमालपत्र

'या' पद्धतीने तयार करा घरगुती स्प्रे

एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात ४ ते ५ लवंगा घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल. पाण्याला उकळी आली की त्यात २ मोठे टेबलस्पून बेकिंग सोडा घाला. नंतर गॅस बंद करा.

व्यायामाला वेळच नाही, जेवणही वेळेवर नाही? करा ५ सोपे बदल, बिझी असूनही वजन पटकन घटेल

पाणी थंड होण्यासाठी ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्या. त्यात काही तमालपत्राची पानं घाला. अशा प्रकारे आपलं होममेड डास आणि झुरळांना पळवून लावणारा उपाय रेडी. आपण या उपायाचा वापर ज्या ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असेल किंवा डास घोंघावत असतील त्या ठिकाणी फवारणी करा. यामुळे डास आणि झुरळं कायमचे पळून जातील. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल