Lokmat Sakhi >Social Viral > ऑनलाइन मागवलेल्या वस्तू पॅक करून आलेले खोके  फेकून देणे खूपच धोकादायक, होऊ शकते आर्थिक फसवणूक

ऑनलाइन मागवलेल्या वस्तू पॅक करून आलेले खोके  फेकून देणे खूपच धोकादायक, होऊ शकते आर्थिक फसवणूक

Important Tips For Online Shopping: ऑनलाईन शॉपिंग करत असताना या काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे.. नाहीतर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते...(fake courier agents can scam you)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2023 11:26 AM2023-10-06T11:26:35+5:302023-10-06T11:27:34+5:30

Important Tips For Online Shopping: ऑनलाईन शॉपिंग करत असताना या काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे.. नाहीतर तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते...(fake courier agents can scam you)

If you order online, never throw your empty boxes anywhere! fake courier agents can scam you, Important Safety Tips For Online Shopping | ऑनलाइन मागवलेल्या वस्तू पॅक करून आलेले खोके  फेकून देणे खूपच धोकादायक, होऊ शकते आर्थिक फसवणूक

ऑनलाइन मागवलेल्या वस्तू पॅक करून आलेले खोके  फेकून देणे खूपच धोकादायक, होऊ शकते आर्थिक फसवणूक

Highlightsकशा पद्धतीने आर्थिक फसवणूक होऊ शकते आणि त्यासाठी आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, ते आता पाहूया....

हल्ली ऑनलाईन शाॅपिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. प्रत्येक घरातच आता महिन्याकाठी किमान ५ ते ६ वस्तू तरी ऑनलाईन येतातच. कारण यामुळे वेळ आणि पैसा यांची बचत होते. घरबसल्या चांगली वस्तू मिळते. शिवाय वस्तू आवडली नाही तर पुन्हा बदलूनही मिळते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग भरपूर प्रमाणात केली जाते. आता एखादी वस्तू घरात आली की आपण ती वस्तू खोक्यातून बाहेर काढतो. वस्तू आवडली तर ती काढून ठेवतो आणि खोके सरळ कचऱ्यात टाकून देतो. पण असं करणं आपली आर्थिक फसवणूक करणारं ठरू शकतं (If you order online, never throw your empty boxes anywhere). यामुळे कशा पद्धतीने आर्थिक फसवणूक होऊ शकते आणि त्यासाठी आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, ते आता पाहूया....(fake courier agents can scam you)

 

कशी होऊ शकते आर्थिक फसवणूक?

याविषयीचा एक छानसा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या cyber_detectives या पेजवर शेअर करण्यात आला आहे. आता आपल्याकडे जेव्हा ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल येते, तेव्हा त्या पार्सलवर एक स्टिकर असते.

आपण खातो त्या सफरचंदावर मेणाचा थर किती आहे, हे तपासण्याची घ्या १ सोपी पद्धत

त्या स्टिकरवर आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आपण कोणती वस्तू कोणत्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घेतली आहे, अशी सर्व माहिती असते. शिवाय त्यावर एक क्युआर कोडही असतो. आपण जेव्हा हे पार्सल तसेच टाकून देतो, तेव्हा जर चुकून ते सायबर क्राईम करणाऱ्या बदमाश माणसांच्या हातात पडले, तर ते त्यावरून आपल्याला फोन करतात.

फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

वस्तूची  डिलेव्हरी झाली असली तरी त्यासंदर्भात काहीतरी अडचण आहे, असे सांगून ओटीपीची मागणी करतात. शिवाय आपल्या वस्तूबाबत संपूर्ण माहिती देतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. त्यानंतर मग ओटीपी शेअर केला की ते आपल्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात.

 

आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

ओटीपी कधीच कोणत्या अनोळखी व्यक्तीला न सांगणे, अशी काळजी आपण घेऊ शकतो. 

पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

पण याशिवाय आणखी एक काळजी घ्यावी, ती म्हणजे पॅकींगच्या खोक्यावर किंवा पाकिटावर चिकटवलेले स्टिकर सगळ्यात आधी फाडून टाकावे. त्यामुळे आपल्या खरेदीचे डिटेल्स कुणाकडेही जाणार नाहीत. 

 

Web Title: If you order online, never throw your empty boxes anywhere! fake courier agents can scam you, Important Safety Tips For Online Shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.