Join us  

मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत कुठे अडकलात तर? कायम बॅगेत ठेवा ५ वस्तू, राहा सुरक्षित रोजच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2024 6:14 PM

Important 5 things to keep in bag during heavy rains : अतिपावसामुळे भरपूर पाणी साचून वाहतूकसेवा ठप्प होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशावेळी गैरसोय होऊ नये म्हणून सोबत ठेवा या ५ वस्तू...

पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूच्या सुरुवातीलाच पावसाने सगळीकडेच दमदार हजेरी लावली दिसत आहे. गेले २ ते ३ दिवस पाऊस जोरदार बरसत आहे. या धुवांधार कोसळणाऱ्या पावसाला पाहून काहीवेळा आनंद होतो तर कधी नकोसे वाटते. भरपूर प्रमाणात पाऊस पडला असता वाहतूक सेवा ठप्प होते, लाईट जातात, घरात पाणी साचते या किंवा अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. अचानक आलेल्या या प्रसंगामुळे सगळ्यांचीच दाणादाण होते(5 Essential Things To Keep In Your Bag During The Monsoon Season).

पावसाळा येतानाच आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. मुसळधार पाऊस पडत असताना काहीवेळा वाहतूक सेवा ठप्प होते. अशावेळी आपण ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी अडकून पडतो. असा अनुभव आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनी एकदा तरी अनुभवला असेलच. वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे अशा पावसांत आपल्याला प्रवास करणे शक्य होत नाही. काहीवेळा तर आपण ऑफिसला किंवा कुठे बाहेर गेले असता पाऊस पडल्यामुळे आपण तिथेच अडकून बसतो. अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची गैरसोय होऊन त्रास होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पावसाळ्यात बाहेर पडताना आपण छत्री, रेनकोट तर घेतोच परंतु  इतर गोष्टींची देखील काळजी घ्यायला हवी. जोरदार पावसामुळे जर आपण ऑफिस किंवा इतर कुठे अडकून राहिलात तर अशावेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नेमके काय करावे ते पाहूयात(Important 5 things to keep in bag during heavy rains).

पावसाळ्यात कायम सोबत ठेवाव्यात अशा काही गोष्टी... 

१. शूज :- ऑफिसला जाताना एक्स्ट्रा पावसाळी सँडल किंवा चपलेचा एक जोड ऑफिसमध्येच ठेवून द्या. यासोबतच एक्स्ट्रा सॉक्स जोड देखील सोबत कॅरी करावा. जेणेकरून ओले झालेले सॉक्स आपण बदलू शकतो. 

राधिका मर्चण्टची मेकअप आर्टिस्ट सांगतेय योगाचा एक भन्नाट प्रकार, आजार राहतील लांब-मूडही होतो छान...

२. कपडे :- पावसाळ्यात आपल्या बॅगेत एक जास्तीचा ड्रेस ठेवून द्यावा. आपण आपल्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये देखील एखादा जास्तीचा टीशर्ट, ड्रेस किंवा कुर्ता ठेवू शकता. खूप पाऊस पडल्यामुळे एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये अचानक राहण्याची वेळ आलीच तर गैरसोय होऊ नये म्हणून आपण ही ट्रिक वापरु शकता. 

३. अन्नपदार्थ :- पावसाळ्यात प्रवास करत असताना शक्यतो बॅगेत सुका खाऊ स्टोअर करून ठेवावा. बॅगेत तुम्ही खाण्यासाठी बिस्किट, वेफर्स, चॉकलेट किंवा इतर स्नॅक्स ठेवू शकता. यासोबतच नेहमी किमान एक तरी पाण्याची मोठी बाटली सोबत ठेवावी. यामुळे आयत्यावेळी भूक लागली तरी तुमची गैरसोय होणार नाही.  याचबरोबर मुसळधार कोसळणाऱ्या पावसात जर तुम्ही कुठे अडकलात तरी उपाशी रहावे लागणार नाही.

रंग- स्केचपेन-मार्करने मुलांनी घराच्या भिंती रंगवल्या? पाहा भिंतींवरचे डाग काढण्याची १ भन्नाट ट्रिक...

४. फोन पाऊच व बॅटरी :- घरातून किंवा ऑफिसमधून निघण्यापूर्वी फोन चार्ज आहे की नाही ते तपासून पाहा. शक्यतो फोन पूर्ण चार्ज करून मगच घराबाहेर पडावे. यासोबत पॉवर बँकही ठेवता येईल, जेणेकरून अडचणीच्या वेळी चार्जर नसेल तरीही तुम्ही मोबाईल चार्ज करु शकता. 

५. छोटे नॅपकिन :- बॅगेत पॉवर बँक आणि खाऊसोबतच एक छोटेसे नॅपकिन देखील ठेवावे. पावसात भिजल्यानंतर डोकं, हातपाय पुसण्यासाठी हा नॅपकिन वापरता येईल.

टॅग्स :सोशल व्हायरल