Join us  

"एलन मस्कच्या हायटेक जगात सुधा मूर्ती भेटणं म्हणजे.......", सुधा मूर्ती विमानतळावर अचानक भेटल्याचा ' तिचा ' अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 7:19 PM

Sudha Murty And Her Simplicity: एका विमान तळावर अगदी सहज सुधा मूर्ती भेटल्या. त्यांची ती भेट किती विलक्षण होती, याविषयी सांगत आहेत एक उद्योजिका.... 

ठळक मुद्देत्या म्हणतात की एवढी मोठी उद्योजक असणारी स्त्री, इंग्लंडच्या पंतप्रधानांची सासू असणारी व्यक्ती आमच्यासोबत विमान तळावरच्या गर्दीत एका सामान्य स्त्री प्रमाणे प्रतिक्षा करत बसली होती

सुधा मूर्तींविषयी आजवर खूप काही ऐकलं होतं, त्यांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या सृजनतेविषयी, त्यांच्या साधेपणाविषयी नेहमीच खूप वाचलं, पाहिलं होतं...पण आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि त्यात सगळ्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तींशी अगदी सहजपणे संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य आणि त्यांचा संयम..... असं सुधा मूर्तींविषयी बरंच काही भरभरून सांगत आहेत India Hemp and Co या कंपनीच्या सहसंस्थापक जयंती भट्टाचार्य... त्यांची सुधा मूर्तीं यांच्याशी एका विमान तळावर झालेली ग्रेट भेट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Woman shared her experience of meeting with Sudha Murty at airport)

 

सुधा मूर्तींच्या व्यक्तीमत्त्वाविषयी भरभरून सांगणारे किस्से नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांची राहणी आणि अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीशी सहज जुळले जाणारे सूर तर भल्याभल्यांना अचंबित करतात.

आयशॅडो न वापरता डोळ्यांचा करा सुंदर मेकअप, खास बिगिनर्ससाठी ४ सोप्या टिप्स, डोळे दिसतील टपोरे- सुंदर

असाच अनुभव जयंती भट्टाचार्य यांनीही घेतला. तोच त्यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी LinkedIn वर शेअर केला आहे. त्या म्हणतात की एवढी मोठी उद्योजक असणारी स्त्री, इंग्लंडच्या पंतप्रधानांची सासू असणारी व्यक्ती आमच्यासोबत विमान तळावरच्या गर्दीत एका सामान्य स्त्री प्रमाणे प्रतिक्षा करत बसली होती, आसपासच्या सर्वसामान्य लोकांशी अगदी सहज संवाद साधत होती. ही गोष्ट आजच्या एलन मस्क सारख्या हायटेक जगात खरोखरंच विलक्षण आहे.

पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम

सध्याच्या प्रॅक्टिकल, कोरड्या आणि भावनाविहिन नव्या हायफाय जगात, साध्या-सालस आणि मानवी भावना जपणाऱ्या सुधा मूर्ती आहेत हे किती छान आहे. याचाच अर्थ आजच्या जगात श्रीमंती आणि सुबत्तेसह साधेपणा, प्रेम आणि माणुसकीही टिकून आहे, ही खरोखरंच आनंदाची गोष्ट आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसुधा मूर्तीविमानतळ