जपानमध्ये लहान मुले आणि तरुणांची संख्या खूप कमी आहे असे आपण अनेक वर्षे ऐकत आहोत. हिरोशिमा आणि नागासाकीच्या धक्क्यातून सावरत असल्याने जपान बरीच वर्ष अस्थिर होता. मात्र त्यानंतरही तेथील लोकांच्या मनावर अनेक जखमा कायम राहील्याचे पाहायला मिळाले. अतिशय कमी वेळात प्रगती करणाऱ्या या देशात कमी लोकसंख्या हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तरुणांमध्ये लग्न करण्याबाबत आणि मूल जन्माला घालण्याबद्दल असलेली अनास्था यामुळे देशाची लोकसंख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसते. त्यामुळेच याठिकाणी ज्येष्ठ नागरीकांच्या तुलनेत लहान मुले आणि तरुण यांची संख्या कमी असल्याचे दिसते (In Japan a Third of todays 18 year old's may not have children according to Study ).
अबब, मिक्सर आहे की..! टीव्ही-फ्रीजचीही चटकन चटणी करणारा पाहा मिक्सर, लोक म्हणाले -हे वाटण कशासाठी?
जपानमध्ये १८ वर्षे वय असलेल्या सुमारे एक तृतीयांश तरुणींना आपल्याला मूल नको असे वाटत असल्याचे एका सरकारी संस्थेने बुधवारी म्हटले आहे. जपान हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे मात्र याठिकाणची लोकसंख्या दिवसेंदिवस कमीच होत असल्याचे चित्र आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्च (IPSS) ने एका अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की 2005 मध्ये जन्मलेल्या 33.4% स्त्रिया अपत्यहीन असतील. सर्वात आशावादी परिस्थितीमध्ये ती संख्या 24.6% आणि सर्वात वाईट 42% असेल. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी जूनमध्ये तीन किंवा अधिक मुले असलेल्या कुटुंबांना मोठ्या पेआउटसह अभूतपूर्व अशा सुविधा देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच लोकसंख्येच्या समस्येचा सामना करण्याचे आश्वासन दिले. २३ वर्षीय अन्ना तानाका यांनी म्हटले की, सध्या कॉस्ट ऑफी लिव्हींग खूप वेगाने वाढते आहे त्यामुळे लोकांना मुलं जन्माला घालणे परवडेल असे मला वाटत नाही.
चार दशकांहून अधिक काळ जपानमधील मुलांची संख्या कमी होत चालली आहे कारण लग्न आणि पालकत्वाची भूक कमी झाली आहे आणि आर्थिक चिंता वाढली आहे, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. लग्न करण्याचे वाढत असलेले वय हे मुलांना जन्म न देण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असल्याचे IPSS चे संचालक मिहो इवासावा म्हणाले. २०२० मध्ये २९ ते ३० वर्षे वय असलेल्या तरुणींनी पहिल्यांदा लग्न केले. इतक्या उशीरा लग्न केल्याने फारतर एका मुलाचा विचार केला जातो असेही इवासावा म्हणाले. मुलांची संख्या कमी असल्याने पूर्वीच्या तुलनेत एका मुलावर जास्त प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे एकूणच मूल वाढवण्याचा सरासरी खर्च जास्त असल्याचे चित्र निर्माण होते आणि इतर लोक भितीने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वाढते असेही ते म्हणाले. जन्मदर कमी असण्याचे कोणतेही एक नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र जन्मदर कमी असल्या कारणाने येत्या ५० वर्षात जपानची लोकसंख्या वेगाने कमी होणार आहे यात शंका नाही.