मंगळवारी ४ मार्चला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्टेलियाचा सामना रंगला. (India vs Australia ICC Champion Trophy 2025) या सामन्यात भारताने ऑस्टेलियाचा पराभव केला आणि अख्ख्या भारतात आनंदाची लाट पसरली... मॅच म्हटलं की,अनेकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. (Anushka Sharma sleeps during Virat Kohli batting) यादरम्यान असे अनेक प्रसंग घडतात की, प्रेक्षकांना त्याविषयीच्या मजेदार गंमती पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. नुकताच पार पडलेल्या भारत-ऑस्टेलियाच्या सेमिफायनलमध्ये देखील बरेच किस्से पाहायला मिळाले. ( Anushka Sharma viral video during cricket match)
विराट कोहलीने अर्धशतक ठोकत पुन्हा एकदा भारताला विजय मिळवून दिला. विराट मैदानावर आला की, चाहते त्यांच्या नावाने ओरडू लागतात. मागच्या कितीतरी सामन्यात विराटचा फॉर्म सापडत नव्हता. हा सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्माने देखील हजेरी लावली होती. ती अनेकदा व्हिआयपी स्टँडवर विराटला पाठिंबा आणि टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी येत असते. परंतु, चालू सामन्यात असा एक क्षण आला की, अनुष्काला झोप लागली. (Anushka Sharma caught sleeping during cricket match)
हा क्षण एक्स (ट्विटरवर) शेअर करण्यात आला. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेली अनुष्का डोळे मिटून, हनुवटीवर हात ठेवून आराम करत असल्याचे दिसून आले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. मुलांना सांभाळते त्यामुळे कदाचित थकली असावी. काहींनी असे म्हटले की, अनुष्का झोपली कारण मॅच खूप मजेशीर होती. दुसऱ्या युर्जसने म्हटले की, आई सहसा अशीच झोपते. लहान मुलांना वाढवणे सोपे काम नाही. काहींनी म्हटलं की, ती झोपली नाही देवाकडे प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याने म्हटलं की, अनुष्काला असे झोपलेल पाहून मज्जा येते.
anushka slept lolz it was so funny to watch 😭😭😭pic.twitter.com/Q4XkUVHnux
anushka slept lolz it was so funny to watch 😭😭😭pic.twitter.com/Q4XkUVHnux— . (@madhub4la) March 5, 2025
अनुष्का शर्मा संपूर्ण सामन्यादरम्यान प्रत्येक क्षण जगताना दिसली. टीम इंडिया आणि विराटच्या आनंदात ती आनंदीही दिसत होती. मागच्या काही काळात विराटच्या फॉर्मसाठी तिला अनेकांनी दोषही दिला परंतु, तिने खचता आपल्या नवऱ्याला पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विराटचे ५१ वे शतक होताच त्याने त्याच्या कृतीतून पुन्हा एकदा अनुष्काबद्दलचे असणारे प्रेम व्यक्त केले. सुरु असलेल्या सामन्यात त्या दोघांच्या नात्यातील प्रेमही पाहायला मिळतं.
व्यावसायिक जीवन
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटात अनुष्का दिसली होती. ज्यामध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर अनुष्काने चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे चित्रीकरण केले, ज्यामध्ये ती भारतीय महिला क्रिकेटपट्टू झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.