लग्न झाल्यानंतर लग्नाचा पहिला वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करावा, याबाबत जोडपी अनेक हटके प्लॅन्स आखतात. लग्नाची अँनिव्हर्सरी हा प्रत्येक जोडप्याचा आवडता आणि खास दिवस असतो. हा दिवस कसा साजरा करावा याचे प्लॅनिंग खूप आधीपासूनच केले जाते. लग्नाची प्रत्येक अँनिव्हर्सरी एकदम खास असावी अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. अशीच काहीशी अनोखी इच्छा असणाऱ्या एका भारतीय जोडप्याचं नेटकरी सध्या कौतुक करत आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीपासून टेनिसचे चाहते असलेल्या एका भारतीय जोडप्याला विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करावा, अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली असल्याचे दिसून येत आहे. या भारतीय जोडप्याने आपल्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस चक्क विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये साजरा केला आहे. या जोडप्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे(Indian Couple Celebrates 36th Wedding Anniversary At Wimbledon).
विम्बल्डनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने या जोडप्याचा व्हिडिओ शेअर केला आणि तेव्हापासून हे जोडपं नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. युट्युबवरील या व्हिडीओमध्ये, ते जोडपं गर्दीने भरलेल्या स्टेडियममध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर स्टेडियम मध्ये सुरु असलेल्या खेळाचा आनंद देखील घेताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला, या जोडप्याने आपण टेनिस या खेळाचे खूप मोठे फॅन असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज, लिएंडर पेस, रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा हे आमचे फार पूर्वीपासूनचे आवडते खेळाडू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही इथे येऊन खूपच इमोशनल झालो आहोत, तसेच या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी हे आमच्या दोघांचे स्वप्न होते, आणि ते स्वप्न आता पूर्ण झाले आहे म्हणून आम्ही खूपच भावुक झालो आहोत. आमच्या ड्रिम डेस्टिनेशनवर आम्ही आलो आहोत, हा आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे(Viral video: Indian couple marks 36th wedding anniversary with celebration at Wimbledon).
प्रियकरानं सोडून जाऊ नये म्हणून ‘तिनं’ पाहा काय केलं, आता खावी लागतेय तुरुंगाची हवा...
पुढे ते म्हणाले, " नोव्हाक जोकोविचला असं लाईव्ह खेळताना बघणं हा क्षण खूप खास आहे. जेव्हा नोव्हाक जोकोविच स्टेडियम मध्ये येतो तेव्हा त्याला पाहून मला खूप बरे वाटेत" ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी या वर्षी विम्बल्डनमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि आलो देखील, आता या आठवणी आम्ही आयुष्यभरासाठी आमच्या मनात जपून ठेवू. एवढेच नव्हे तर या भारतीय जोडप्याने स्टेडियममध्ये बसून आयकॉनिक स्ट्रॉबेरी विथ क्रिम या स्पेशल अशा स्वीट डिशचा आनंद घेत त्यांचा अनुभव आणखी खास बनवला(Indian couple celebrate 36th wedding anniversary at Wimbledon).
विम्बल्डनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ १० जुलै रोजी शेअर केला होता. तेव्हापासून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा खूप मोठा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. या जोडप्याचा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. युट्युबवर या व्हिडिओला ८००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बऱ्याच नेटकऱ्यांनी या जोडप्याला "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या." नेटकऱ्यांपैकी एकाने कमेंट् केली की, "जीवनातील असे खास प्रसंग व साध्या सोप्या गोष्टीतच आनंद मानणे हेच सर्वात मौल्यवान आहे." आणखी एका नेटकऱ्याने त्यांचे फार पूर्वीचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल या जोडप्याचे अभिनंदन केले आणि "क्या बात." अशी कमेंट्स करत या जोडप्याची वाह वाह केली.