कंबोडियातील (Cambodia) भारताच्या राजदूत देवयानी खोब्रागडे (Devyani Khobragade), काही ना काही करणामुळे सतत चर्चेत असतात. अटक असो किंवा भ्रष्टाचाराचे इतर आरोप. प्रत्येक वेळी देवयानी यांचं नाव देशभरात पसरलं आहे (Social Viral). नुकतंच त्या पुन्हा सोशल मीडियात चर्चेत आल्या असून, सध्या चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. देवयानी यांचे काही फोटो सोशल मिडियात व्हायरल होत आहे, आणि या फोटोमध्ये देवयानी जणू 'अप्सरा' दिसत आहे.
ख्मेर नववर्षाच्यानिमित्ताने कंबोडियातील भारताची राजदूत देवयानी यांनी, 'ख्मेर अप्सरा' म्हणून वेशभूषा साकारली आहे. त्यांना ख्मेर संस्कृती आणि परंपरेबद्दल खूप कौतुक आहे, आणि याच कौतुकापोटी त्यांनी ही वेशभूषा सकारात कंबोडिया देशाप्रती असलेलं प्रेम दर्शवलं आहे(Indian diplomat dresses up as 'Apsara' on Cambodian New Year).
फॅमिली इर्मर्जन्सीचं कारण सांगून ‘ती’ आयपीएल मॅचला गेली, बॉसला टीव्हीवर दिसली आणि.. मोये-मोये
'कंबोडियाची सोनपरी'..
कंबोडियन देशातील लोक सध्या नवीन वर्षावर आधारित ख्मेर हा सण साजरा करीत आहे. हा उत्सव १३ व १४ एप्रिल अशा दोन दिवस साजरा करण्यात येतो. ख्मेर नववर्ष साजरे करताना स्त्रिया पारंपारिक अप्सराप्रमाणे पोशाख परिधान करतात. देवयानी खोब्रागडे यांनीही हीच परंपरा पाळत अप्सराची वेशभूषा साकारली आहे. शिवाय फोटोशूटही केले आहे. त्यांनी हे खास फोटो सोशल मीडियात शेअर केले असून, नवीन वर्षाच्या लोकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. देवयानी या वेशभूषेत सुंदर आणि पिवळ्याधमक सोनपरीप्रमाणे चमकत असून, तिच्या या सौंदर्याचे कौतुक सोशल मीडियात होत आहे.
शंभरीच्या उंबरठ्यावर महिलेला मिळालं अमेरिकन नागरिकत्व, अमेरिकन ड्रिमची ‘अशी’ही गोष्ट
कोण आहेत देवयानी खोब्रागडे?
देवयानी खोब्रागडे या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९९ साली केली. त्यांनी आतापर्यंत बर्लिन, न्यूयॉर्क, इस्लामाबाद आणि रोम येथील भारतीय मिशनमध्ये राजनैतिक भूमिका पार पाडल्या असून, २०२० साली त्यांची कंबोडियामध्ये भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य म्हणजे या व्यतिरिक्त त्या व्यवसायाने डॉक्टर देखील आहेत.