(Photo Credit : Fb profile/@reena.varma.146)
भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी पाकिस्तान सोडून भारतात गेल्यानंतर 75 वर्षानंतर 90 वर्षीय रीना छिब्बर वर्मा यांचे रावळपिंडी येथील वडिलोपार्जित घर पाहण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. पाकिस्तानने भारतीय नागरिक वर्मा यांना व्हिसा मंजूर केला आणि त्या वाघा-अटारी सीमेवरून शनिवारी तेथे पोहोचल्या. (Indian womans wish to see her ancestral house in rawalpindi fulfilled after 75 years)
पाकिस्तानात पोहोचल्यानंतर डोळ्यातील अश्रू घेऊन, वर्मा त्यांच्या गावी रावळपिंडीला रवाना झाल्या, जिथे त्या त्यांनी वडिलोपार्जित घर आणि शाळेला भेट दिली आणि बालपणीच्या मित्र मैत्रिणींना भेटल्या. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये पुण्यातील रहिवासी वर्मा यांनी सांगितले की, फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब रावळपिंडीतील देवी कॉलेज रोडवर राहत होते. (90 year old Indian woman revisits Pak after 75 years to see her ancestral home in Rawalpindi)
माध्यमांशी बोलताना जुने दिवस आठवत त्या म्हणाल्या, ''मी मॉडर्न स्कूलमध्ये शिकत असे. माझी चार भावंडेही याच शाळेत शिकली. माझा भाऊ आणि एक बहीण देखील मॉडर्न स्कूलजवळ असलेल्या गॉर्डन कॉलेजमध्ये शिकले. माझ्या मोठ्या भाऊ-बहिणींचे मुस्लिम मित्र होते ते आमच्या घरी यायचे कारण माझे वडील एक पुरोगामी विचार करणारे होते आणि त्यांना मुला-मुलींना एकमेकांना भेटण्यात कोणतीही अडचण नव्हती. फाळणीपूर्वी हिंदू-मुस्लिम असा वाद नव्हता. हे सर्व फाळणीनंतर घडले.'' सदिच्छा म्हणून, भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांनी वर्मा यांना तीन महिन्यांचा व्हिसा मंजूर केला. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी वयाच्या १५ व्या वर्षी वर्मा भारतात आले.
पहिल्यांदा लोणचं चाखून पाहिल्यानंतर बाळानं दिली 'अशी' रिएक्शन; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल
वर्मा यांनी 1965 मध्ये पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता परंतु युद्धामुळे दोन्ही देशांमधील तणावामुळे त्यांना व्हिसा नाकारण्यात आला होता. आयुष्याचे सत्तरी पार केलेल्या वर्मा यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर पाकिस्तानी नागरिक सज्जाद हैदरने सोशल मीडियावर त्याच्याशी संपर्क साधला आणि रावळपिंडीतील त्याच्या घराचे फोटो पाठवले.
अभ्यास करत नाही म्हणून आईनं धोपटलं; पप्पांनी 'का रडतोस', असं विचारलं तर लेक म्हणाला..
अलीकडेच त्यांनी पुन्हा पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हीना रब्बानी खार यांना टॅग करून आपली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी त्यांच्या व्हिसाची व्यवस्था करण्यात आली.