Lokmat Sakhi >Social Viral > सौदी अरेबियात भारतीय लष्करी महिला अधिकारी करणार भारताचे प्रतिनिधित्व, भारतीय महिलांचे अभिमानास्पद काम

सौदी अरेबियात भारतीय लष्करी महिला अधिकारी करणार भारताचे प्रतिनिधित्व, भारतीय महिलांचे अभिमानास्पद काम

Indian women officers to take part in Saudi defence show : 'कौतुकास्पद! महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे'- पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2024 01:03 PM2024-02-06T13:03:05+5:302024-02-06T13:04:35+5:30

Indian women officers to take part in Saudi defence show : 'कौतुकास्पद! महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे'- पंतप्रधान

Indian women officers to take part in Saudi defence show | सौदी अरेबियात भारतीय लष्करी महिला अधिकारी करणार भारताचे प्रतिनिधित्व, भारतीय महिलांचे अभिमानास्पद काम

सौदी अरेबियात भारतीय लष्करी महिला अधिकारी करणार भारताचे प्रतिनिधित्व, भारतीय महिलांचे अभिमानास्पद काम

आज प्रत्येक भारतीय 'म्हारी छोरियां छोरों से कम है के' असं गर्वाने म्हणताना दिसत आहे. कारण स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानावर कार्यरत आहेत (Women Power). सिनेमा असो किंवा मंत्रालयात सर्वत्र महिलांचे राज्य पाहायला मिळते. नुकतंच भारतीयांना अभिमान वाटेल अशी बातमी समोर येत आहे. या बातमीतून संपूर्ण जगाला स्त्रीशक्तची ताकद दिसेल यात काही दुमत नाही (Saudi Arabia).

सौदी अरेबियाची राजधानी म्हणजेच रियाध येथे होणाऱ्या वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये ३ महिला भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, या तिन्ही महिला लष्करात आघाडीच्या भूमिकेत आहेत(Indian women officers to take part in Saudi defence show).

भारताला अभिमान वाटावे असे कार्य..

सौदी अरेबियात ४ ते ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वर्ल्ड डिफेन्स शोमध्ये, भारताकडून ३ महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. या तीन महिला अधिकाऱ्यांमध्ये एक फायटर पायलट, दुसरी लढाऊ अभियंता आणि तिसरी युद्धनौकेवर कार्यरत असणारी महिला आहे. स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ, कर्नल पोनुंग डोमिंग आणि लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश अशी त्यांची नावे आहेत.

रियाधमध्ये वर्ल्ड डिफेन्स शोचे आयोजन

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, 'रियाधमधील शो वर्ल्ड डिफेन्स इंडस्ट्री नेटवर्कबद्दल माहिती, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सर्व संरक्षण क्षेत्रातील नवीन कल्पना आणि क्षमता एक्सप्लोर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्वोच्च लष्करी नेते, सरकारी अधिकारी आणि संरक्षण उद्योगातील कॅप्टन सहभागी होणार आहेत.'

पूनम जिंदा है, लेकीन आप.. पोलिसांनी दिली ताकीद, म्हणाले ती मरून जिवंत झाली, तुमचे काय..

स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ

स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ, २०१६ साली भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून सामील झालेल्या पहिल्या तीन महिलांपैकी एक आहे. ७ फेब्रुवारी रोजी 'इन्व्हेस्टिंग इन इनक्लुसिव्ह फ्युचर' या विषयावरील पॅनल चर्चेत त्या सहभागी होणार आहेत. शिवाय संरक्षण क्षेत्रातील सर्व स्तरांवर महिलांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासह पोनुंग डोमिंग आणि अन्नू प्रकाश हे देखील या शोमध्ये सहभागी होणार आहेत.

लेकरु धाडकन पडलं पण आईचं लक्ष डान्स रिलवर, व्हायरल व्हिडिओ-असा कसा हा नाद?

'महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे'

२७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, 'जग पाहत आहे, भारताची महिला शक्ती प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करत आहेत. जगात एक आदर्श निर्माण करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त महिला अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथमच परेडमध्ये भाग घेतला होता. याशिवाय, सहा फायटर पायलटसह १५ महिला वैमानिक देखील या नेत्रदीपक फ्लाय पास्टमध्ये सहभागी झाले होते. ज्यांनी राफेल, सुखोई-३० आणि हेलिकॉप्टर उडवून सर्वांनाच अचंबित केले होते.'

Web Title: Indian women officers to take part in Saudi defence show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.