Lokmat Sakhi >Social Viral > AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

India’s First AI Mom Kavya Mehra: काव्या मेहरा ही भारताची पहिली AI-Mom सोशल इन्फ्लूएन्सर म्हणून ओळखली जात आहे. साेशल मिडियावर सध्या तिचीच चर्चा आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 17:59 IST2024-12-06T17:59:02+5:302024-12-06T17:59:54+5:30

India’s First AI Mom Kavya Mehra: काव्या मेहरा ही भारताची पहिली AI-Mom सोशल इन्फ्लूएन्सर म्हणून ओळखली जात आहे. साेशल मिडियावर सध्या तिचीच चर्चा आहे..

India’s First AI Mom Kavya Mehra is a social influencer shares recipe, parenting tips | AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

Highlightsकाव्या मेहराला तुम्ही जर इन्स्टाग्रामवर थोडं शोधून पाहिलं तर ती किती प्रसिद्ध झाली आहे, याचा तुम्हाला लगेचच अंदाज येऊन जाईल.

आर्टिफिशियल इन्टेलिजन्स म्हणजेच AI ने आता एकेक क्षेत्रात प्रवेश करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपुर्वीच केरळच्या तिरुवअनंतपुरम येथे एआय टीचर रोबोटने शाळेत येऊन कशी धूम केली ते आपल्याला माहितीच आहे. आता इन्स्टाग्रामवरही काव्या मेहरा नावाची सोशल इन्फ्लूएन्सर सध्या गाजते आहे. बऱ्याच ठिकाणी तिच्याच नावाची चर्चा आहे. पण गंमत म्हणजे ही काव्या मेहरा ही कोणीही खरीखुरी व्यक्ती नसून संगणकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी तिची निर्मिती केली आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही दिवसांपुर्वी आलेला शाहिद कपूरचा 'तेरी बातोंमे ऐसा उलझा जिया' हा सिनेमा आठवतो का? त्या सिनेमामध्ये क्रिती सेनन ही जशी रोबोट होती, ती कोणीही हाडामांसाची व्यक्ती नव्हती. तशीच तिच्यासारखीच ही काव्या मेहरा आहे... फक्त ती रोबोट नाही.(India’s First AI Mom Kavya Mehra)


 

काव्या मेहराला तुम्ही जर इन्स्टाग्रामवर थोडं शोधून पाहिलं तर ती किती प्रसिद्ध झाली आहे, याचा तुम्हाला लगेचच अंदाज येऊन जाईल.

चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

सोशल मिडियावर काव्या वेगवेगळ्या कुकींग टिप्स शेअर करते, कधी वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी सांगते, तर कधी एक अधुनिक आई बाळाची कशी काळजी घेऊ शकते किंवा तिने बाळासाठी काय करावं, काय टाळावं अशा वेगवेगळ्या पॅरेंटींग टिप्सही ती देते.. एवढंच नाही तर ती बऱ्याचदा ब्यूटी टिप्सही शेअर करत असते. 


 

काव्या जे काही सांगते त्या सगळ्या टिप्स फक्त आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून काव्याचा चेहरा वापरून त्या लोकांसमोर आणल्या जातात.

डासांनी कडाकड चावून हैराण केलं? २ सोपे उपाय- डास तुमच्या घराच्या आसपासही फिरकणार नाहीत 

 काव्या मेहरा हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे काही व्हिडिओ, फोटो नक्कीच बघायला हवेत..
 

Web Title: India’s First AI Mom Kavya Mehra is a social influencer shares recipe, parenting tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.