आपल्यापैकी कित्येकजण कामानिमित्त विमान प्रवास करत असतील. आपल्या विमानप्रवासादरम्यान, प्रवाशांची काळजी घेणं आणि त्यांचा प्रवास सुसह्य करणं ही एअर होस्टेस्टची प्रमुख जबाबदारी असते. यामध्ये विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुखसोयी, समाधान आणि सामान्य गरजांकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. दरवाजात उभं राहून प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करणं, प्रवाशांना त्यांच्या आरक्षित जागेपर्यंत जाण्यासाठी दिशा दाखवणं, विमान उड्डाणापूर्वी आणि नंतर प्रवाशांना त्यांचे सीट बेल्ट बांधण्यास मदत करणं, त्यांचं सामान वरील रॅकमध्ये नीट रचून ठेवणं हे देखील त्यांना करावं लागतं. अशाप्रकारे एअर होस्टेस ही विमानात फक्त तुम्हाला चहा-कॉफी देणारी व्यक्ती नसते तर तुमच्या जीवनाच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी तिच्यावर असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका एअर होस्टेसचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ही एअर होस्टेस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे(Indigo Air Hostess Provides Medical Facility : Wins Netizens' Praise).
नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये?
इंडिगो एअर लाईन्सच्या एका एअर होस्टेसने एका प्रवाश्यासोबत जोरदार भांडण केल्याचा व्हिडीओ हल्लीच व्हायरल झाला होता. त्यामुळे या एअर लाईन्सला खूप ट्रोल करण्यात आले होते. परंतु आता याच एअर लाईन्सच्या एका एअर होस्टेसचा प्रवाशाची काळजी घेतानाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा प्रसंग २७ डिसेंबर २०२२ रोजी दोहाहुन दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअर लाईनच्या विमानात घडलेला आहे. हा व्हिडीओ ज्यांनी कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ते इरफान अन्सारी देखील याच विमानाने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान, एका प्रवाश्याच्या हाताला इजा झाली. तेव्हा या एअर होस्टेसने त्यांच्या जखमेवर व्यवस्थित मलम पट्टी केली. ज्येष्ठ व्यक्तींना, आजारी प्रवाशांना मदत करून त्यांची अडचण दूर करणं, त्यांना औषधं पुरवणं, पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू पुरवण्याचं कामंही त्या व्यवस्थित सांभाळतात. ही एअर होस्टेससुद्धा आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसत आहे.
Dear @IndiGo6E Please reward the both cabin crew, I know its there job but the way they treated i believe our own relative also will not take care the way they did, Salute🫡, Big respect to the girls and @IndiGo6E 👏🏻👏🏻👏🏻💐🇮🇳💐@DGCAIndiapic.twitter.com/m1WmdEVa69
— Irfan Ansari (@irfanhasan1986) December 28, 2022
कॅप्शनमध्ये काय म्हटले आहे ?
इरफान अन्सारी या एका युजरने हा व्हिडीओ शेअर करत त्याला साजेशी अशी कॅप्शनपण दिली आहे. कॅप्शनमध्ये असे लिहीले आहे की, “प्रिय इंडिगो, कृपया दोन्ही केबिन क्रू मेम्बर्सना बक्षीस द्या. मला माहित आहे की हे त्यांचे कामच आहे परंतु त्यांनी ज्या प्रकारे त्या प्रवाश्याला वागणूक दिली... मला विश्वास आहे की आमचे स्वतःचे नातेवाईकदेखील आमची इतकी काळजी घेणार नाहीत. सलाम! दोन्ही केबिन क्रूला मेम्बर्स आणि इंडिगो यांना खूप आदर.
नेटकरी काय म्हणत आहेत ?
एका नेटकाऱ्याने 'उत्तम काम' अशी कमेंट केली आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी क्रू मेम्बर्सच्या कामाचे कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या व्हिडिओला २८००० पेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत तर १९ जणांनी हा व्हिडीओ री - ट्विट केला आहे.
याबाबत इंडिगो एअरलाईन्सची प्रतिक्रिया...
गेल्याच आठवड्यात इंडिगो एअर लाईन्सच्या इस्तंबूल-दिल्ली फ्लाइटमध्ये एका हवाईसुंदरीचा प्रवाशासोबत जेवणावरून जोरदार वाद झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यामुळे इंडिगो एअरलाईन्सला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले होते. परंतु इरफान अन्सारी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे इंडिगो एअर लाईन्समध्ये असणाऱ्या त्या हवाईसुंदरींच्या मानवतेचे दर्शन होताना दिसत आहे. यासाठी इंडिगो एअर लाईन्सने इरफान अन्सारी यांचे धन्यवाद मानून आभार व्यक्त केले आहे