आई आणि मुलाचे नाते हे अद्भुत आणि निखळ प्रेमाच्या झऱ्याप्रमाणे असते. जेव्हा मुल जन्माला येतं, तेव्हा आई डोळ्यात तेल घालून मुलाची काळजी घेत असते. मुलाला कोणती दुखापत होऊ नये, यासाठी ती रात्रंदिवस एक करते. बऱ्याचदा मुलाचे बोबडे बोलही आईला उमजून येतात. पण कधी कधी आईकडूनही चुका होऊ शकतात, अशावेळी घरातील वरिष्ठ सदस्य चूक सुधारण्यास मदत करतात. पण अनेकदा आईचा निष्काळजीपणा मुलाच्या अंगाशी येऊ शकतं (Social Viral).
अशाच एका आईचा निष्काळजीपणा मुलाच्या अंगाशी तर आलाच, पण यामुळे नुकत्याच जन्मलेल्या तान्हुल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युनायटेड स्टेट्सस्थित एका महिलेने आपल्या पोटच्या गोळ्याला चक्क ओव्हनमध्ये ठेवलं असून, तिच्या या निष्काळजीपणामुळे मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे(Infant dies after Missouri mom puts her in oven, claims she mistook cooker for crib).
काळीज पिळवटून टाकणारी घटना..
मुलाच्या आजोबांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'शुक्रवारी दिनांक ९ फेब्रुवारी रोजी, दुपारी एक वाजता. थॉमसने घरी फोन करून मला घरी बोलावले होते. ती फोनमध्ये बाळाच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय, तुम्ही पटकन घरी या, असं ती म्हणाली. घरातून त्या वेळेस धुराचा वास येत होता. जेव्हा झारियाला पाळण्यात पाहिले, तेव्हा तिच्या शरीरावर भाजलेल्या जखमा दिसत होत्या. मुख्य म्हणजे तिने घातलेलं डायपर वितळून शरीराला चिकटले होते.'
'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग
डेली मेलला थॉमसच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, 'थॉमसची मानसिक स्थिती बिघडलेली होती. ती बऱ्याचदा लहानमुलांप्रमाणे वागायची. यामुळेही कदाचित तिने असं काही केलं असावं. थॉमसचे बाळ महिनाभरापूर्वी जन्मलेले. त्यामुळे ही घटना ऐकून आम्ही सगळेच हादरलो आहोत.'
बाळाला ओव्हनमध्ये ठेवण्याची चूक तिने केलीच कशी?
फॉक्स ४ च्या वृत्तनुसार, थॉमस आपल्या मुलाला झोपवण्यासाठी पाळण्याच्या दिशेने जात होती. पण गडबडीत तिने पाळण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवले, आणि काही कालावधीनंतर तिला कळले की, आपण आपल्या मुलाला पाळण्यात नसून, ओव्हनमध्ये ठेवले आहे.
AI आणि इंटरनेटच्या जगात राहा सावध, ६ स्मार्ट सूत्र - महिलांना ठेवतील ऑनलाइन सुरक्षित
यासंदर्भात, वकील जीन पीटर्स बेकर यांनी द न्यूयॉर्क पोस्टला माहिती देताना सांगितले, 'थॉमसवर मुलाच्या हत्येचा आरोप आहे. हे प्रकरण घडल्यानंतर आम्ही सगळेच जण हादरून गेलो आहोत. या बाळाला आपत्कालीन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात नेले, पण बाळाचे शरीर भीषणरित्या भाजल्यामुळे त्याचा अंत झाला.'