Lokmat Sakhi >Social Viral > आता नाही होऊ शकणार मी आई पण..! वयाच्या ३२ व्या वर्षी गर्भाशय काढावं लागलेली एन्फ्लूएन्सर सांगते..

आता नाही होऊ शकणार मी आई पण..! वयाच्या ३२ व्या वर्षी गर्भाशय काढावं लागलेली एन्फ्लूएन्सर सांगते..

Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says.. : वयाच्या ३२व्या वर्षी गर्भाशय काढावे लागले. जाणून घ्या कारण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 15:03 IST2025-02-14T15:01:43+5:302025-02-14T15:03:02+5:30

Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says.. : वयाच्या ३२व्या वर्षी गर्भाशय काढावे लागले. जाणून घ्या कारण.

Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says.. | आता नाही होऊ शकणार मी आई पण..! वयाच्या ३२ व्या वर्षी गर्भाशय काढावं लागलेली एन्फ्लूएन्सर सांगते..

आता नाही होऊ शकणार मी आई पण..! वयाच्या ३२ व्या वर्षी गर्भाशय काढावं लागलेली एन्फ्लूएन्सर सांगते..

मुलींनी काय करावे काय नाही हे सांगण्यासाठी लोकं उत्सुक असतात. तिचे निर्णय कसे चुकीचे असतात. ते सांगण्यासाठी तत्पर असतात. (Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says..)तसंच यूट्यूबर सलोनी श्रीवास्तवला लोकांनी गर्भाशय काढण्याच्या विचारावरून ऐकवले होते. पण तिने गर्भाशय काढून घेतले. आणि तिने तसं का केलं याबद्दलही सांगितले. काहींनी तिला ट्रोल केले तर काहींनी प्रोत्साहन दिले. (Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says..)

सलोनी एक लाईफस्टाइल यूट्यूबर आहे. तसेच ती मार्केटींग मार्गदर्शनही करते. (Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says..)हल्लीच तिला एक अत्यंत कठीण निर्णय घ्यायला लागला. ज्यामध्ये तिला वयाच्या ३२व्या वर्षी गर्भाशय काढून टाकावे लागले. सलोनी म्हणाली, "मी महिन्यातले दहा दिवसंच जगत होते. बाकी त्रासात जायचे. पाळीमध्ये मला प्रचंड त्रास व्हायचा. पाळी आधी-नंतरही व्हायचा. त्यापासून मी सुटकारा मिळवला आहे. मा‍झ्या निर्णयाने मला आनंद मिळाला आहे. मी माझं स्वास्थ्य निवडलं. त्यात काही चूक नाही." 

सलोनीला डॉक्टरांकडून कळलं की, ती कधी आई नाही होऊ शकणार. त्याचं दु:खं तिला आहेच. तिच्या मेडिकल कंडिशनमुळे तिला गर्भधारणा होणार नाही. सलोनीचा पाळीचा त्रास इतका वाढला की, तिची सहनशक्ती संपली. सलोनीने सांगितले, तिने अनेक डॉक्टरांशी संवाद साधला. पण त्यांना तिच्या त्रासापेक्षा तिला बाळ नाही याची खंत वाटत होती. सलोनी म्हणाली, "लोकांना अस्तित्वात नसलेल्या बाळाची काळजी जास्त वाटली माझी नाही." तिने नंतर सांगितले मी सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला. मी माझं सुख निवडलं. 

पुढे सलोनीने तिच्या नवऱ्याचे मतही सांगितले, ती म्हणाली, "हा निर्णय फक्त माझ्याच नाही तर, माझ्या नवऱ्याच्या आयुष्यावरही परिणाम करणारा आहे. मी त्याला सगळं नीट सांगितल्यावर त्याने मा‍झ्या निर्णयाला पाठिंबा दिला. घरच्यांनीही तुझ्या शरीराचा निर्णय तूच घे. आम्ही पाठीशी आहोत.असं सांगितलं. 

पुढे तिने मुलींनी अशा सर्जरी कराव्यात असं मी अजिबात सुचवत नाही. असं सांगितलं. पण जर तोच शेवटचा पर्याय असेल तर, कायम स्वत:चे स्वास्थ्य निवडा. योग्य डॉक्टरांना भेटण्यासाठी आधी दहा जणांशी संवाद साधावा लागेल. अनेक मुलींना असा त्रास होतो. त्यांनीही योग्य ती ट्रिटमेंट घ्या. आनंदी राहा. असा सल्ला सलोनीने मुलींना दिला. बाळासाठीही अनेक पर्याय असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आधी तुम्ही मग बाकी सगळं हे लक्षात ठेवा.  

Web Title: Influencer had to have a hysterectomy at the age of 32 says..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.