Join us  

कपड्यांवर शाईचे डाग पडले? घरातली 'ही' वस्तू वापरा- डाग कुठे पडला होता कळणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 3:26 PM

How To Clean Ink Stains On Clothes: कपड्यांवर पडलेले शाईचे डाग काढून टाकण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय लक्षात ठेवा... (Home remedies to clear ink stains on clothes)

ठळक मुद्देचांगले कपडे वाया जाऊ नयेत, यासाठी हा सोपा उपाय पाहून ठेवा.

लहान मुलं त्यांच्या शाळेच्या गणवेशावर बऱ्याचदा शाईचे डाग लावून येतात. एखादा शाईचा पेन लिक होतो आणि त्या शाईचे डाग मग ड्रेसवर, रुमालावर पडतात. बऱ्याचदा पुरुष मंडळींनी त्यांच्या खिशाला लावलेल्या पेनची शाईदेखील लीक होते आणि मग शाईचा डाग पडल्याने चांगले कपडे खराब होतात (Ink Mark Removal Tip). असं झालं की मग आपण ते डाग काढण्याचा भरपूर प्रयत्न करतो, पण तरीही डाग स्वच्छ न झाल्याने ते कपडे मग नाईलाजाने टाकून द्यावे लागतात (How to clean ink stains on clothes). म्हणूनच आता चांगले कपडे वाया जाऊ नयेत, यासाठी हा सोपा उपाय पाहून ठेवा. (Home remedies to clear ink stains on clothes)

 

कपड्यांवरचे शाईचे डाग काढून टाकण्याचा उपाय

- कपड्यांवरचे शाईचे डाग कसे काढून टाकायचे याचा सोपा उपाय priyavijaykitchen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केसांच्या आरोग्यासाठी ३ पदार्थ खा! केस गळणं कमी होईल- म्हातारपणातही केस काळेच राहतील

- यामध्ये जो उपाय सांगितला आहे, त्यानुसार कपड्यांवरचे शाईचे डाग पुर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. 

- हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त डेटॉलचा वापर करायचा आहे. एरवी आपण जखमेवर लावायला डेटॉल वापरतो. पण आता मात्र कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी डेटॉल कसे वापरावे त पाहा.

 

- जिथे शाईचे डाग लागले असतील त्या जागेवर काही थेंब डेटॉल टाका. शाईचा डाग डेटॉलने पुर्णपणे भिजायला पाहिजे, एवढे डेटॉल टाकावे.

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

- त्यानंतर एखाद्या मिनिटाने घरातला एखादा खराब टुथब्रश घेऊन त्या डागावर घासा. डाग निघून जाण्यास मदत होईल. 

- डाग निघून गेल्यानंतर मग नेहमीप्रमाणे साबण लावून कपडा धुवून टाका. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी