Lokmat Sakhi >Social Viral > कुछ भी हो जाये तमीजसे! - सुश्मिता सेन सांगतेय वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेला सल्ला..

कुछ भी हो जाये तमीजसे! - सुश्मिता सेन सांगतेय वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेला सल्ला..

Statement of Actress Sushmita Sen: तुम्हाला कुणी कितीही वाईट शब्दांत प्रश्न विचारला तरीही त्याला कसं उत्तर द्यायचं, याविषयी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सांगितलेली ही खास बात नक्की वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 05:38 PM2023-08-10T17:38:10+5:302023-08-10T17:39:37+5:30

Statement of Actress Sushmita Sen: तुम्हाला कुणी कितीही वाईट शब्दांत प्रश्न विचारला तरीही त्याला कसं उत्तर द्यायचं, याविषयी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सांगितलेली ही खास बात नक्की वाचा...

Inspirational quote shared by Actress Sushmita Sen, Sushmita Sen speaking about her carrier | कुछ भी हो जाये तमीजसे! - सुश्मिता सेन सांगतेय वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेला सल्ला..

कुछ भी हो जाये तमीजसे! - सुश्मिता सेन सांगतेय वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेला सल्ला..

Highlightsअगदी तरुण वयात तिला एका व्यक्तीकडून नेमका कोणता सल्ला मिळाला होता, हे तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

विश्वसुंदरी सुश्मिता सेन सांगत असलेली ही एक गोष्ट सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. बिनधास्त अभिनेत्री- मॉडेल अशी सुश्मिताची इमेज आहे. वैयक्तिक आयुष्य असो की करिअर असो, कोणताही निर्णय घेतला तरी तो मोठ्या हिमतीने शेवटपर्यंत नेण्याची जबरदस्त जिद्द तिच्यामध्ये आहे. आता सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (viral video of  Actress Sushmita Sen) होत आहे. यामध्ये अगदी तरुण वयात तिला एका व्यक्तीकडून नेमका कोणता सल्ला मिळाला होता, हे तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.(Inspirational quote shared by Actress Sushmita Sen)

 

तिचा हा व्हायरल व्हिडिओ म्हणजे एका इंटरव्यूचा छोटासा भाग आहे. यामध्ये ती म्हणते की तिच्या करिअरच्या अगदी सुरुवातीला म्हणजे ती जेमतेम २१ वर्षांची असताना तिला हा सल्ला मिळाला होता.

६ गोष्टी वापरुन घरच्याघरी बनवा नाईट क्रिम, निस्तेज त्वचा दिसेल एकदम चमकदार 

हा सल्ला तिला नेमका कोणी दिला हे नाव मात्र तिने उघड केले नाही. ती म्हणते की त्या व्यक्तीने तिला असे सांगितले होते की कोणी कितीही वाईट पद्धतीने तुला प्रश्न विचारला तरीही त्या प्रश्नाचे उत्तर नेहमी 'तमीज'नेच द्यायचे. कारण इतिहास नेहमी तुझे उत्तर लक्षात ठेवेल. तो प्रश्न कोणता होता, हे कोणीही विचारणार नाही.

 

सुष्मिता म्हणते की ही गोष्ट तिच्या मनावर अगदी कोरली गेलेली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तिला कुणाला उत्तर देण्याची वेळ येते, तेव्हा तिला सल्ल्यामध्ये मिळालेली ती 'तमीज' आठवते आणि ती शांतपणे उत्तर देते. ती म्हणते की मी दिलेलं उत्तर त्या समोरच्या व्यक्तीला जरी त्यावेळी समजलं नाही, तरी हरकत नाही.

केस वाढतच नाहीत, कमी वयात पांढरे झाले? ५ योगासनं करा, केस हाेतील मजबूत- लांब, गळणंही होईल कमी

पण यदाकदाचित त्या इतिहासात ते नोंदवलं गेलंच तर जी कोणी व्यक्ती ते ऐकेल त्याला तरी ते समजेल अशी अपेक्षा आहे. बऱ्याचदा बोलताना आपण आपलं संतुलन हरवून बसतो आणि नेमकं जे बोलायचं नाही तेच बोलतो. अशामुळे विनाकारण शाब्दिक वाद वाढतात आणि प्रकरण कुठच्या कुठे जाऊन पोहोचतं. अशा प्रसंगांमध्ये आपण जर सुश्मिताला मिळालेला हा सल्ला लक्षात ठेवला, तर नक्कीच वाद टळू शकतात.

सुश्मिताचा हा व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://www.facebook.com/reel/1411713516275372


 

Web Title: Inspirational quote shared by Actress Sushmita Sen, Sushmita Sen speaking about her carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.