Lokmat Sakhi >Social Viral > बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं कर्ज; कुटुंबाला मदत म्हणून बारावीत असताना तरुणी शाळेबाहेर शेंगदाणे विकतेय..

बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं कर्ज; कुटुंबाला मदत म्हणून बारावीत असताना तरुणी शाळेबाहेर शेंगदाणे विकतेय..

inspirational stories : बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठे कर्ज असल्याने विनिशाने शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर असून आईही शेंगदाणे विकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:52 PM2022-10-28T12:52:07+5:302022-10-28T14:54:59+5:30

inspirational stories : बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठे कर्ज असल्याने विनिशाने शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर असून आईही शेंगदाणे विकते.

Inspirational stories : Class12 student vinisha sell peanuts outside their own school in kerala | बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं कर्ज; कुटुंबाला मदत म्हणून बारावीत असताना तरुणी शाळेबाहेर शेंगदाणे विकतेय..

बहिणीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं कर्ज; कुटुंबाला मदत म्हणून बारावीत असताना तरुणी शाळेबाहेर शेंगदाणे विकतेय..

मनात जिद्द ठेवली तर प्रतिकूल परिस्थितीतूनही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येतं. याचचं हुबेहूब उदाहरण असलेली तरूणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. चांगले शिक्षण मिळणे केवळ अवघडच नाही तर महागडेही आहे. चांगले शिक्षण घेणे अनेकांसाठी सोपे नसते, त्यांना परिश्रमपूर्वक काम करावे लागते. मात्र, केरळमधील या बारावीच्या विद्यार्थिनीने तिची स्वप्ने सत्यात उतरवण्याचा निर्धार केला आहे आणि त्यासाठी दररोज मेहनत घेत आहे. (Class12 student vinisha sell peanuts outside their own school in kerala)

केरळमधील चेरथला येथील विनिशा शिकण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि त्याच वेळी आपले जीवन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. बारावीची एक विद्यार्थिनी तिचे वर्ग संपल्यावर तिच्या शाळेच्या बाहेर शेंगदाणे विकते. विनिशा कॉलेज सुटल्यानंतर तिची शेंगदाण्याची गाडी घेऊन बाहेर पडते आणि तिला शाळा सोडावी लागू नये यासाठी ती रात्री ८ वाजेपर्यंत शेंगदाणे विकते. आधी गरम तव्यावर मिठात शेंगदाणे भाजून घेते आणि नंतर ते विक्रीस ठेवते. 

बाबौ! या जोडप्याचं खतरनाक प्री-वेडींग शूट पाहून कपाळावर हात माराल, पाहा व्हिडिओ

बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठे कर्ज असल्याने विनिशा यांनी शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर असून आईही शेंगदाणे विकते. शेंगदाणे विकताना तासनतास उभे राहिल्याने आईच्या पायाच्या दुखण्याचा त्रास वाढला. त्यानंतर कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी विनिशा स्वतः पुढे आली आणि शेंगदाणे विकण्याचा निर्णय घेतला.

विनिशा गेल्या चार वर्षांपासून तिच्या पालकांना मदत करत आहे. AsianNet ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनिशा म्हणाली की ती दुपारी साडेचार वाजता काम सुरू करते आणि रात्री 8 वाजता संपते. शेंगदाणे विकल्यानंतर ती घरी जाऊन अभ्यास करते. प्रामाणिकपणे वागण्याचा ती सर्वतोपरी प्रयत्न करत असताना तिची लोक कशी चेष्टा करतात असं तिनं सांगितलं. तिला तिची कमाई करण्यात आणि अनुभवातून शिकण्याचा अभिमान वाटतो.

Web Title: Inspirational stories : Class12 student vinisha sell peanuts outside their own school in kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.