Join us  

वाह, मानलं! २० वर्षांच्या पोरीनं सुरू केलं मत्स्यपालन अन् वर्षभरातच कमावले २५ लाख..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 1:27 PM

Inspirational Stories : आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द ठेवणाऱ्या सगळ्यांना या तरुणीच्या कामानं प्रेरणा मिळावी.

काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यातील तरुण वयातच स्वत:चा बिझनेस उभारत यश मिळवलं. तिनं सुरू केलेले मत्स्यपालन व्यवसाय आणि कमीत वेळेत मिळवलेलं यश यांनी नेटिझन्सचं मन जिंकलं आहे. या तरुणीचं नाव हिना असून तिला तिच्या कुटुंबानं या व्यवसायात खूप साथ दिली. (This kashmiri woman has set up her own fish farm earns rs 25 lakh annually) आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द ठेवणाऱ्या सगळ्यांसाठीच या तरुणीनं आदर्श ठेवला आहे.

काश्मीर विद्यापीठातून बिझनेस शिकणाऱ्या हिना परेने इंडियाटाइमला सांगितले की, ''मला मासेमारीत नेहमीच रस होता. (Inspirational Stories) मी माझ्या वडिलांसोबत मासे पकडायला जायचे आणि तेव्हाच मला आवड निर्माण झाली. मी माझा स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या वडिलांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करायचं ठरवलं,''

पुढे ती म्हणाली, ''माझ्या कुटुंबाकडून मला पूर्ण पाठिंबा मिळाल्याने, मी पुलवामा येथील मत्स्यव्यवसाय विभागाशी संपर्क साधला आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) योजनेअंतर्गत फिश-फार्म युनिटच्या परवान्यासाठी अर्ज केला.'' PMMSY हा भारत सरकारने सर्वसमावेशक फ्रेमवर्क स्थापित करण्यासाठी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अभाव कमी करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया