Join us  

क्या बात, भावंडांची कमाल! चौघांनीही केली युपीएससी क्रॅक आणि झाले आयएएस - आयपीएस अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 6:23 PM

Inspirational: अशी एक से बढकर एक असावीत भावंड (success of siblings). बघा चौघंही जणं आज झाले आहेत आयएएस आणि आयपीएस अधिकारी (IAS- IPS Officers).. बघा नेमकं कसं जमलं त्यांना हे.. 

ठळक मुद्देमुलांच्या या यशाविषयी सांगताना त्यांचे पालक म्हणाले की यापेक्षा आणखी दुसरं काय हवं.. मुलांच्या या यशामुळे माझी मान आज ताठ झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. 

एक वाक्य आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं आणि बऱ्याच अंशी ते खरंही आहे. असं म्हणतात की घरातलं मोठं भावंड हुशार निघालं की आपोआपच त्याच्याकडे पाहून त्याची लहान भावंडही हुशार होतात. त्याच्याकडे बघून अनेक चांगल्या गोष्टी शिकतात. असंच काहीसं झालं आहे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लालगंज (Lal Ganj) भागात राहणाऱ्या या चौघा भावंडांचं. एकाने युपीएससीची (UPSC) वाट धरली आणि घवघवीत यश मिळवलं. त्याचं पाहून मग लहान भावंडही त्याच वाटेवर चालू लागली. आणि चक्क बघता बघता चौघेही जण आयएएस, आयपीएस अधिकारी (IAS- IPS Officers) झाले.

 

कोणत्याही पालकांसाठी हा क्षण म्हणजे अत्यंत अभिमानाचा. इंडियन एक्सप्रेस यांनी दिलेल्या वृत्तानुसार मुलांनी मिळवलेल्या यशाविषयी बोलताना त्यांचे वडील अनिलप्रकाश मिश्रा म्हणाले की मी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी केली. पण तरीही मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत मात्र कुठेही तडजोड केली नाही. त्यांना भविष्यात चांगली नोकरी मिळावी, असं मला वाटायचंआणि त्यानुसार माझ्या मुलांनीही नेहमीच त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. या चौघा भावंडांपैकी सगळ्यात मोठा असणारा योगेश मिश्रा IAS अधिकारी आहे. त्यानी त्याचे सुरुवातीचे शिक्षण लालगंज येथून पुर्ण केले आणि नंतर मोतिलाल नेहरू नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. २०१३ साली तो युपीएससी परिक्षा (UPSC Exam) पास झाला. 

 

त्याच्यापेक्षा धाकटी असणारी बहिणी क्षमा मिश्रा हिने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले आणि आज ती IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहे. यानंतरची बहिण माधुरी मिश्रा हिने २०१४ साली युपीएससी क्रॅक केली आणि आता ती IAS अधिकारी झाली आहे. सगळ्यात धाकटा भाऊ लोकेश मिश्रा २०१५ साली युपीएससी पास झाला असून आता तो बिहार येथे IPS अधिकारी आहे. मुलांच्या या यशाविषयी सांगताना त्यांचे पालक म्हणाले की यापेक्षा आणखी दुसरं काय हवं.. मुलांच्या या यशामुळे माझी मान आज ताठ झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला.  

टॅग्स :सोशल व्हायरलप्रेरणादायक गोष्टीकेंद्रीय लोकसेवा आयोग