Join us  

मला वेड लागले रील्स बघण्याचे! असं झालं असेल तर सावधान, मायग्रेनचा धोका आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 5:12 PM

Instagram Reels: Why Are We Obsessed With Them? दिवस रात्र नुसतं रील्स पाहता, उडेल झोप आणि आरोग्यावर भयंकर दुष्परिणाम

सध्या लोकांना मोबाईलची सवय इतकी लागली आहे की, दिवस - रात्र त्यांच्या हातात मोबाईल दिसतो. लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल लागतो. ज्यामुळे स्क्रीन टायमिंग वाढते, व आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. सध्या लोकांमध्ये रील्स पाहण्याचा क्रेज पाहायला मिळतो. लोकं सतत स्क्रीन स्क्रोल करत बसतात.

बलरामपूर हॉस्पिटलच्या अभ्यासानुसार, जे लोक रील पाहतात, त्यापैकी ६० टक्के लोक निद्रानाश, डोकेदुखी, मायग्रेनसारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य विभागाने ओपीडीमध्ये आलेल्या दीडशे रुग्णांवर हा अभ्यास केला. हा अभ्यास ६ महिन्यात पूर्ण झाला. या अभ्यासात १० ते ५५ वयोगटातील मानसिक रुग्णांचा समावेश होता. यासह ३० महिला रुग्णांचाही समावेश होता(Instagram Reels: Why Are We Obsessed With Them?).

काय सांगते स्टडी..

यासंदर्भात, मानसिक आरोग्य विभागाचे एचओडी डॉ. देवाशिष शुक्ला सांगतात, ''या अभ्यासात सहभागी असलेले रुग्ण गेले दीड वर्षांहून अधिक काळापासून रील्स पाहत आले आहेत. हे लोकं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्याच्याआधी सोशल मीडियावर रिल्स स्क्रोल करत बसतात. यात त्यांचा किती वेळ जातो, हे त्याचं त्यांना कळत नाही. या रुग्णांनी त्यांचा कोणताही व्हिडिओ किंवा रील सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. फक्त इतरांचे रील्स बघण्याची सवय त्यांना लागलेली असते.''

रील्स बघण्याचे साईड इफेक्ट्स

या अभ्यासात सहभागी असलेल्या १५० लोकांपैकी ३० रुग्णांनी सांगितले की, जेव्हा त्यांना रील्स पाहायला मिळत नाही, तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागते. रील न पाहिल्यामुळे काम करावेसे वाटत नाही, व काही वेळेनंतर डोकेदुखी देखील होते. या प्रकरणात ब्लड प्रेशरमध्येही चढउतार पाहायला मिळतो. २० टक्के रुग्णांच्या मते, रिल्स पाहिल्यामुळे त्यांची झोप मोडते. व रिल्स पाहिल्याशिवाय त्यांना झोप देखील लागत नाही.

ऑफिसमध्ये दुपारी झोप येते? ३ सोप्या ट्रिक्स, झोप चटकन उडेल

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार..

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ''या अभ्यासात सामील झालेल्या ६० टक्के लोकांच्या  दिनचर्येवर परिणाम होतो. त्यांची झोप अपूर्ण होते. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होते. यासह डोकेदुखी, डोळे दुखणे, झोपताना डोळ्यांत चमक येणे, जेवणाची वेळ खराब होणे अशा समस्या निर्माण होतात.

फ्रिजचा डोअर रबर कळकट - खराब झालाय? ५ टिप्स, स्वच्छता झटपट-फ्रिज दिसेल नव्यासारखा

रील्सची सवय सोडण्यासाठी टिप्स

फोनवर अधिक रिल्स पाहण्याची सवय हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा.

गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरण्याचा प्रयत्न करा.

तुमची आवडती पुस्तके वाचा.

मित्रांसोबत हँग आउट करा. शक्य तितकं इतरांशी संवाद साधा.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल