Join us  

२ मिनिटांत सोलून होईल ढिगभर लसूण; झटपट लसूण सोलण्याच्या ४ ट्रिक्स; वेळ आणि कष्ट दोन्हीही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:51 PM

Instant Way to Peel Garlic Kitchen Hacks : कमी वेळात लसूण सोलण्याच्या काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात.

स्वयंपाकात लसणाचा वापर जेवणाची चव वाढवतो. (Kitchen Hacks) लसणाच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक महिला स्वयंपाक करताना लसूण वापरण्याचा कंटाळा करतात कारण लसणाची सालं काढायला वेळ लागतो. (Instant Way to Peel Garlic) याशिवाय हातांना वासही येतो. तर लसूण सोलताना अनेकांची नखं दुखतात. म्हणून काहीजण सालीसकट लसूण भाजीत घालतात.  कमी वेळात लसूण सोलण्याच्या काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. (Easy Garlic Peeling Trick Best way to easily peel garlic)

लसूण सोलण्यासाठी लाटण्याचा वापर करा

जर तुम्हाला लसूण सोलणं खूपच कठीण वाटत असेल तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता. लाटण्याच्या साहाय्याने सहज लसूण सोलता येतात. यासाठी पिठाच्या गोळ्यावर ज्याप्रमाणे लाटणी चालवली जाते तसेच लाटणी लसणावर फिरवा. ही क्रिया २ ते ३ वेळा करा.  लसूण व्यवस्थित दाबले गेल्यानंतर सालं आपोआप व्यवस्थित निघतील. 

गरम पाणी

लसूण सोलण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. ही ट्रिक उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमधये गरम पाणी घाला. आता त्यात लसणाच्या पाकळ्या घालून ३ मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर बाऊल काहीवेळासाठी ओव्हनमध्ये ठेवा. नंतर बाऊल बाहेर काढून हलक्या हातांनी घासून सालं काढून घ्या. यामुळे हातांना लसणाचा वासही येणार नाही आणि लसूण पटकन सोलून होतील.

तांदळाच्या मोदकांची पारी येत नाही? न लाटता-न हाताने वळता अशी करा मोदकाची परफेक्ट पारी

सुरीचा वापर करा

लसूण सोलण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता. धार असलेल्या सुरीने लसूण सोलण्याचं किचकट काम एकदम सोपं होईल. लसणाच्या पाकळ्यांचं टोक कापून सालं काढा. याव्यतिरिक्त एका डब्यात लसूण घालून डब्याचे झाकण लावून १० ते १२ शेक करा. डबा उघडून नंतर लसणाचे सालं काढा. या उपायाने लसणाची सालं पटापट निघतील. लसूण सोलल्यानंतर हातातून लसणाचा तीव्र वास जात नसेल तर तुम्ही एपल सायडर व्हिनेगर किंवा नारळाचं तेल वापरू शकता. 

नैवेद्य दाखवायचाय, वेळ कमी आहे? १० मिनिटांत घरीच करा रबडीसारखी खीर; पटकन बनेल नैवेद्य

मायक्रोव्हेव

लसणाच्या पाकळ्या मायक्रोव्हेव्हमध्ये घाला आणि ३० सेकंदाचे टायमर लावा. नंतर मायक्रोव्हेव म्हणून काढल्यानंतर पाहा. लसणाचं साल अर्धवट निघालेलं असेल नंतर साल आरामात निघेल. मायक्रोव्हेव नसेल तर तुम्ही कढई किंवा तव्यावर लसूण आधी भाजू शकता.  गरम झाल्यानंतर लसणाचे साल पटापट निघते.

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स