Lokmat Sakhi >Social Viral > International left handers day 2022 : ५ कामं करताना डावखुऱ्या महिलांची होते चांगलीच पंचाईत, त्या अडचणींवर उपाय काय?

International left handers day 2022 : ५ कामं करताना डावखुऱ्या महिलांची होते चांगलीच पंचाईत, त्या अडचणींवर उपाय काय?

Left Handers Day 2022: उजव्या हाताने झटपट कामे करता येतील, अशा पद्धतीने बहुतांश वस्तूंची रचना केलेली असते. म्हणूनच तर मग अशी काही कामं करताना डावखुऱ्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 02:27 PM2022-08-13T14:27:31+5:302022-08-13T14:28:13+5:30

Left Handers Day 2022: उजव्या हाताने झटपट कामे करता येतील, अशा पद्धतीने बहुतांश वस्तूंची रचना केलेली असते. म्हणूनच तर मग अशी काही कामं करताना डावखुऱ्या व्यक्तींची चांगलीच पंचाईत होते...

International left handers day 2022 :Common Problems left hander people faces every day | International left handers day 2022 : ५ कामं करताना डावखुऱ्या महिलांची होते चांगलीच पंचाईत, त्या अडचणींवर उपाय काय?

International left handers day 2022 : ५ कामं करताना डावखुऱ्या महिलांची होते चांगलीच पंचाईत, त्या अडचणींवर उपाय काय?

Highlightsडावखुऱ्या लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी डावखुरे आणि उजवे लोक हे समानच आहेत, हे सगळ्या जगाला सांगण्यासाठी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लेफ्ट हॅण्डर्स डे म्हणून जगभर साजरा केला जातो. 

लहान मुल जेव्हा मोठं होऊ लागतं तेव्हा ते खेळताना, खाताना कोणता हात जास्त पुढे करतांय, याकडे घरातल्या ज्येष्ठ मंडळींचं अगदी बारकाईने लक्ष असतं. उजव्याच्या ऐवजी डावा हात पुढे झालाच, तर मोठ्या माणसांकडून त्याला उजवा हात जास्त वापरण्याविषयी सुचविले जाते. त्याने ऐकले तर ठीक.. नाहीतर मग रागवून रागवून डाव्या हाताची सवय मोडण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही हात सारखेच असले तरी उजव्या हाताने काम करणे श्रेष्ठ आणि डाव्याने काम करणे जरा कनिष्ठ दर्जाचे मानले जाते. म्हणूनच तर डावखुऱ्या लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी डावखुरे आणि उजवे लोक हे समानच आहेत, हे सगळ्या जगाला सांगण्यासाठी १३ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लेफ्ट हॅण्डर्स डे (International left handers day 2022) म्हणून जगभर साजरा केला जातो. 

 

जन्माला आलेलं मुल हे डाव्या हाताने काम करणारं असेल की उजव्या हाताने हे शरीरातील काही जीन्सवर अवलंबून असते. त्यामुळे त्यात वाईट  काहीच  नसते. जगभरात १३ टक्के लोक डावखुरे आहेत, शिवाय आपल्या रोजच्या कामातल्या अनेक वस्तू अशा पद्धतीच्या असतात की त्यांच्यासोबत काम करणं उजव्या हाताच्या लोकांसाठी सोयीस्कर असतं, पण डावखुऱ्या मंडळींना मात्र जास्तच कसरत करावी लागते. लेफ्ट हॅण्डर्सच्या अशाच काही अडचणींविषयी जनजागृती करण्यासाठी डी. आर. कॅम्पबेल यांनी १९७६ साली लेफ्ट हॅण्डर्स डे पहिल्यांदा साजरा केला. त्यानंतर लेफ्ट हॅण्डर्स क्लबची स्थापना होऊन हा दिवस दरवर्षी साजरा होऊ लागला.  

 

डावखुऱ्या व्यक्ती विशेषत: महिलांसमोरच्या अडचणी
१. फ्रिज, मायक्रोवेव्ह यासारख्या गोष्टींचे दरवाजे उजव्या हाताच्या लोकांना सहजतेने उघडता येतील अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात. त्यामुळे डावखुऱ्या महिलांची चांगलीच अडचण होते.
२. स्वयंपाक घरातली अनेक कामं सोयीची आणि झटपट करण्यासाठी कात्री अतिशय उपयुक्त ठरते. पण मोठ्या आकाराच्या कात्रीची पकड अशा पद्धतीने डिझाईन् केलेली असते की त्यामुळे ती उजव्या हातात पकडणे सोयीचे होईल.
३. बहुतांश स्वयंपाक घरात गॅस ओट्याजवळ वस्तू ठेवण्याची जागा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेली असते की त्या वस्तू उजव्या हाताने घेणे सहज शक्य होईल. अशा स्वयंपाकघरात डावखुऱ्या महिलांना काम करणे कठीण जाते. 

 

डावखुऱ्या व्यक्तींना या ही अडचणी येतात.
- टु- व्हिलर, फाेर व्हिलर सुरु करण्यासाठी चावी ज्या ठिकाणी लावावी लागते, ते सगळे पॉईंटदेखील उजव्या हातानेच असतात. विशेषत: टु व्हिलर चालवताना गाडी बॅलेन्स करत डावा हात पुर्णपणे उजवीकडे घेत चावी फिरवणे, लेफ्ट हॅण्डर्ससाठी कठीण जाते. 
- ऑफिसमध्ये डेस्कवर काम करताना डेस्कची रचना उजव्या हाताने काम करता येईल, अशा पद्धतीने अधिक असते. 
- एटीएम मशिनची बटणं देखील उजव्या हातालाच असतात. 


 

Web Title: International left handers day 2022 :Common Problems left hander people faces every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.