राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे वरवर पाहता अतिशय धीरगंभीर, शांत आणि संयमी वाटणारी व्यक्तिमत्त्व. खरंतर देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली ही व्यक्ती. पण ना कुठला खळखळाट, ना कोणता थयथयाट.. एखाद्या नदीचा अगदी शांत प्रवाह वाटावा, असा त्यांचा प्रवास सुरू आहे. पण ती गंभीर शांतता त्यांच्या स्वभावात नेमकी आली कुठून आणि कशी... याच्यासारखेच त्यांच्याविषयीचे कित्येक प्रश्न आपल्या सारख्यांच्या मनात आहेतच. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नेमके हेच प्रश्न त्यांना विचारले आणि त्यातून द्रौपदी मुर्मू यांचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व खुलत गेलं. बघा नेमका कसा झाला त्या दोघींमधला संवाद...
smritiiraniofficial या इन्स्टाग्राम पेजवरून स्मृती इराणी यांनी या मुलाखतीचा काही भाग व्हायरल केला आहे. त्यात त्यांना पहिला प्रश्न होता तो खाजगी आयुष्याविषयी. द्रौपदी मुर्मू यांच्या पतीचं निधन झालं.
कोणती पारंपरिक साडी कुठून खरेदी करावी? बघा खास माहिती
पुढच्या काही वर्षांतच दोन्ही मुलांचंही निधन झालं. आई म्हणून, पत्नी म्हणून हा आघात खूपच भयानक होता. त्यावेळी स्वत:ला कसं सांभाळलं, याविषयी सांगताना त्या म्हणाल्या की त्या काळात त्या खूप नैराश्यात गेल्या होत्या. पण कुणीतरी त्यांना योगा करण्याचा सल्ला दिला. त्यांनी नियमितपणे योगा सुरू केला आणि त्यामुळेच त्या नैराश्यातून बाहेर येऊ शकल्या.
द्रौपदी मुर्मू यांना दुसरा प्रश्न विचारला गेला तो त्यांच्या मेट्राे प्रवासाबाबत. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्यातली निरागसता आणि कुतूहलता आपल्या लक्षात येते.
घरातल्या स्त्रियांनी 'असं' केलेलं अमिताभ बच्चन यांना मुळीच खपायचं नाही- बघा नेमकं काय होतं
राष्ट्रपती असल्या म्हणून काय झालं, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात मेट्रोबाबत जे कुतूहल होतं, तेच कुतूहल राष्ट्रपतींच्या मनातही होतं. त्यामुळेच तर मी ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे मेट्रोमध्ये बसले आणि त्याचा आनंद घेतला, असं त्यांनी हळूवार हसत सांगितलं.
तेच तर आता माझं कुटूंब...
त्या दोघींच्या संवादातून समोर आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती म्हणून जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती भवनात पाय ठेवला, तेव्हा त्याच दिवशी राष्ट्रपती भवनातील सगळ्यांना आपल्या हाताने मिठाई खाऊ घालत त्यांचं तोंड गोड केलं.
हजार रुपयांचं फेशियल करा फक्त १० रुपयांत, बघा कसं करायचं इंस्टंट ग्लो देणारं ब्रायडल फेशियल
दिवाळी असो किंवा होळी असो, त्या राष्ट्रपती भवनातील प्रत्येक लहान- मोठ्या कर्मचाऱ्याला भेटून शुभेच्छा देतात. पुढच्या ५ वर्षांसाठी तेच तर माझं कुटूंब आहे. त्यामुळे कोणत्याही आनंद मी सगळ्यात आधी त्यांच्यासोबतच साजरा करते... यातूनच मुर्मू यांच्यातलं मातृत्व, कुटूंबाबद्दलचं वात्सल्य आणि प्रेम दिसून येतं...