सध्या बी- टाऊनमध्ये पुन्हा एकदा लग्नाचा माहोल जमून आला आहे. कपूर घराण्याचा वंशज दस्तूरखुद्द रणबीर कपूर (Ranbir Kapoor- Alia Bhat) आणि महेश भट यांची कन्या अभिनेत्री आलिया भट यांचा हा विवाह सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.. एकीकडे कपूर आणि भट या दोन्ही घरांमध्ये सध्या लगीनघाईची लगबग सुरू असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे रणबीर किंवा आलिया या दोघांनीही लग्नाची ऑफिशियल घोषणा अजूनही न केल्यामुळे त्यांचं लग्न खरंच पुढच्या आठवड्यात आहे की नाही, याबाबतही संभ्रम दिसून येतोय.. अशातच कपूर घराण्यातील एका लग्नाची आमंत्रण पत्रिका सोशल मिडियावर (viral invitation on social media) चांगलीच व्हायरल झाली आहे...
आता रणबीर- आलियाचं लग्न म्हटल्यावर त्यांच्याच लग्नाची पत्रिका असणार असा अंदाज सहज कुणीही बांधू शकतं.. पण इथेच तर खरी गफलत होतेय.. ही व्हायरल पत्रिका रणबीर- आलियाच्या लग्नाची नाहीच.. .ही पत्रिका आहे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नितू (Neetu Singh and Rishi Kapoor) या दोघांच्या तब्बल ४० वर्षांपुर्वी झालेल्या रिसेप्शनची. या दोघांच्या लग्नाचा स्वागत सोहळा २३ जानेवारी १९८० रोजी थाटामाटात पार पडला होता. या स्वागत सोहळ्याचीच ही पत्रिका असून सध्या ती सोशल मिडियावर गाजते आहे.
"Mr & Mrs Raj Kapoor request the pleasure of your company on the auspicious occasion of the marriage reception of their son Rishi with Neetu.. " असा मजकूर या पत्रिकेवर आहे. इन्स्टाग्रामच्या tadka_bollywood या पेजवर ही पत्रिका शेअर करण्यात आली असून आता पुन्हा एकदा रणवीर- आलियाच्या लग्नाच्या चर्चेमुळे पत्रिका व्हायरल झाली आहे.. ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या लग्नाचे रिसेप्शन तेव्हा चेंबूर येथील आर. के. स्टुडियो येथे आयोजित करण्यात आले होते. रिसेप्शन पत्रिका अतिशय साधी असून ती पाहून अनेक जणांना ऋषी कपूर यांची प्रकर्षाने आठवण झाली.