Lokmat Sakhi >Social Viral > Viral Video : भर स्टेडियममध्ये गर्लफ्रेंड किस करायला जवळ आली; तेव्हढ्यात पठ्ठ्यानं केलं असं काही.....

Viral Video : भर स्टेडियममध्ये गर्लफ्रेंड किस करायला जवळ आली; तेव्हढ्यात पठ्ठ्यानं केलं असं काही.....

Viral Video : व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा आणि मुलगी सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते. त्यांची कृती पाहून दोघेही प्रेमीयुगुल असल्याचे दिसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:42 PM2022-04-10T17:42:45+5:302022-04-10T18:28:53+5:30

Viral Video : व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा आणि मुलगी सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते. त्यांची कृती पाहून दोघेही प्रेमीयुगुल असल्याचे दिसते.

IPL 2022 Viral Video : Girlfriend want to kiss in a stadium during match then boyfriend did this publicly | Viral Video : भर स्टेडियममध्ये गर्लफ्रेंड किस करायला जवळ आली; तेव्हढ्यात पठ्ठ्यानं केलं असं काही.....

Viral Video : भर स्टेडियममध्ये गर्लफ्रेंड किस करायला जवळ आली; तेव्हढ्यात पठ्ठ्यानं केलं असं काही.....

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) 10 व्या सामन्या दरम्यान स्टेडियममध्ये एका जोडप्यात असे काहीतरी घडले, जे अनेकदा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी सामन्यादरम्यान एक जोडपे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांसमोरच चुंबन घेताना कॅमेऱ्यात कैद झाले. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयपीएल सामन्यादरम्यानचा नसून अन्य कोणत्यातरी सामन्यादरम्यानचा आहे. (Girlfriend want to kiss in a stadium during match then boyfriend did this publicly)

स्टेडिएममध्ये मॅच पाहण्यासाठी उपस्थित होतं जोडपं

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा आणि मुलगी सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते. त्यांची कृती पाहून दोघेही प्रेमीयुगुल असल्याचे दिसते. स्टेडियममध्ये सामना पाहताना दोघेही खूप एन्जॉय करताना दिसले. दरम्यान, प्रियकराला काय करावे हे समजत नव्हते, तो आपल्या प्रेयसीसोबत विनोद करण्याचा विचार करतो. यानंतर काय होते ते व्हिडिओमध्ये पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की काही वेळातच तो हजारो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सामन्यादरम्यान स्टेडियम खचाखच भरलेले असते आणि बरेच प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. येथे प्रियकर-प्रेयसीही मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यानंतर प्रियकराला आपल्या मैत्रिणीसोबत प्रँक करावासा वाटला. यानंतर त्याने भरलेल्या स्टेडियममध्ये मैत्रिणीकडे चुंबनाची मागणी केली.

 उन्हामुळे त्वचा खूप काळी पडलीये? फक्त ४ उपाय करा, चेहरा नेहमी दिसेल ग्लोईंग

प्रेयसी प्रियकराची मागणी नाकारू शकली नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर, तिने चुंबन घेण्यासाठी पुढे जाताच प्रियकर तोंड फिरवतो. यानंतर प्रेयसीचा चेहरा बघण्यासारखा असतो. गंमत म्हणजे कॅमेरामनने यावेळी संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आता हा सीन वेगाने व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओला विनोदी कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 
 

Web Title: IPL 2022 Viral Video : Girlfriend want to kiss in a stadium during match then boyfriend did this publicly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.