Join us  

बघा आयपीएलचं वेड! CSK चा लोगो घेऊन तयार केली लग्नपत्रिका, 'एवढी' ठेवली एन्ट्री फी.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 10:16 AM

Wedding Invitation Card With IPL Theme: आयपीएलचा तुफान फिव्हर सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. अगदी लग्नसराईतही त्याचीच झलक दिसून येत आहे. बघा त्याचीच ही व्हायरल स्टोरी...

ठळक मुद्देआयपीएल ही थीम घेऊन अतिशय कल्पकतेने तयार केलेली त्यांची लग्नपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल सध्या एकदम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सगळीकडे सध्या दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे निवडणूका आणि दुसरं म्हणजे आयपीएल (Ipl 2024). आता भारतीयांचं क्रिकेट प्रेम तर काही विचारायलाच नको. त्या वेड्या प्रेमाचे तर अनेक किस्से व्हायरल आहेत. हा एक लग्नाचा किस्साही त्याच प्रकारचा.. होणारे नवरा- बायको दोघेही क्रिकेट वेडे. ऐन आयपीएल भरात आलेलं असताना त्यांचं लग्न झालं. त्यामुळे त्यांच्या लग्नातही आयपीएलची मस्त झलक दिसून आली (innovative wedding invitation card). आयपीएल ही थीम घेऊन अतिशय कल्पकतेने तयार केलेली त्यांची लग्नपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (wedding invitation in ipl ticket theme)

 

cskfansofficial and whistlepoduarmy या इन्स्टाग्राम पेजवरून ही पत्रिका शेअर करण्यात आली आहे. मार्टीन आणि गिफ्टलीन असं त्या दाम्पत्याचं नाव असून दोघेही मुळचे तामिळनाडूचे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग संघावर त्यांचं विशेष प्रेम आणि दोघेही त्या संघाचे, धोनीचे चाहते.

गोरं होण्याच्या वेडापायी किडनी खराब होऊ शकते, बघा फेअरनेस क्रीम लावण्याचे धोके

त्यामुळे त्यांनी आयपीएलच्या तिकिटाप्रमाणे लग्नपत्रिका तयार केली. या पत्रिकेच्या एका बाजुने त्या दोघांचा फोटो आहे तर दुसऱ्याबाजुला चेन्नई सुपरकिंग संघाचा लोगो आहे. ती पत्रिका अतिशय वाचनीय झाली असून त्यांनी मॅच प्रिव्ह्यू, मॅच प्रेडिक्शन असे आयपीएलच्या तिकिटावर असतात तसे कॉलम घेऊन त्यात दोघांविषयी अतिशय रंजक माहिती लिहिली आहे.

 

आयपीएलच्या तिकिटावर एन्ट्री फी आणि त्यावरचा टॅक्स असे दोन कॉलम असतात.

उरलेली फळं, भाज्या फ्रिजमध्ये तशाच कोंबता? ४ सोप्या पद्धती बघा, भाज्या- फळं राहतील फ्रेश

मार्टीन आणि गिफ्टलीनच्या पत्रिकेवरही तसे कॉलम असून त्यांनी लग्नाच्या एन्ट्री फिमध्ये “love” असं तर त्यावरचा टॅक्स म्हणून “blessings” द्या असं लिहिलं आहे. त्यांची ही कल्पकता आणि त्यांचं क्रिकेट वेड सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झालं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललग्नआयपीएल २०२४