Lokmat Sakhi >Social Viral > सणसमारंभात घालण्याच्या भरजरी-नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या कपड्यांना इस्त्री करण्याच्या ६ टिप्स, कपड्यांचे नुकसान टाळा...

सणसमारंभात घालण्याच्या भरजरी-नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या कपड्यांना इस्त्री करण्याच्या ६ टिप्स, कपड्यांचे नुकसान टाळा...

Ironing Hack : A step by step guide to iron your embroidered outfits at home : tips & tricks to have to iron a embroidered outfits at home : महागड्या कपड्यांवरील भरजरी, नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क खराब होऊ न देता इस्त्री करा बिनधास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2024 12:51 PM2024-09-06T12:51:58+5:302024-09-06T13:05:08+5:30

Ironing Hack : A step by step guide to iron your embroidered outfits at home : tips & tricks to have to iron a embroidered outfits at home : महागड्या कपड्यांवरील भरजरी, नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क खराब होऊ न देता इस्त्री करा बिनधास्त !

Ironing Hack : A step by step guide to iron your embroidered outfits at home | सणसमारंभात घालण्याच्या भरजरी-नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या कपड्यांना इस्त्री करण्याच्या ६ टिप्स, कपड्यांचे नुकसान टाळा...

सणसमारंभात घालण्याच्या भरजरी-नाजूक एम्ब्रॉयडरी असलेल्या कपड्यांना इस्त्री करण्याच्या ६ टिप्स, कपड्यांचे नुकसान टाळा...

सणवार म्हटलं की आपण ठेवणीतले भरजरी कपडे अगदी हौशीने घालतो. हे भरजरी कपडे आपण फक्त खास प्रसंग किंवा सणावारालाच घालतो इतर वेळी हे कपडे आपण एका बॅगेत भरून कपाटात ठेवतो. असे कपडे वर्षानुवर्षे बॅगेत किंवा कपाटात भरुन ठेवल्याने ते चुरुन जातात. या कपड्यांवर घडी घालून ठेवल्याने रेषा, सुरकुत्या पडतात. असे ठेवणीतले घडी किंवा सुरकुत्या पडलेले कपडे सणावाराला घालायचे म्हटल्यावर त्यांना इस्त्री करणे आलेच. हे कपडे आपण इस्त्री केल्याशिवाय घालूच शकत नाही. त्याचबरोबर काहीजणांना कपड्यांना करकरीत इस्त्री केल्याशिवाय घालावेसेच वाटत नाही(From Cotton To Silk, Here’s How To Safely Iron Different Types Of Fabrics).

आपल्याकडील ठेवणीतील काही कपडे असे असतात की त्यांच्यावर अतिशय नाजूक, बारीक धागाकाम, मोतीवर्क, नक्षीकाम, एम्ब्रॉयडरी केलेले असते. असे कपडे धुताना व इस्त्री करताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा कपड्यांची बारकाईने विशेष काळजी घेतली नाही तर त्यावरील नाजूक नक्षीकाम खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, हे कपडे खराब होऊ नये म्हणून इस्त्री करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात(A step by step guide to iron your embroidered outfits at home).

एम्ब्रॉयडरी किंवा इतर नाजूक नक्षीकाम केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना अशी घ्या काळजी... 

१. अ‍ॅल्युमिनियम फॉईल :- एम्ब्रॉयडरी किंवा इतर नाजूक नक्षीकाम केलेल्या कपड्यांना इस्त्री करताना आपण अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा वापर करु शकतो. कपड्याच्या ज्या भागावर वर्क केलेले असेल त्या भागावर अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा तुकडा ठेवून मग त्यावरून हलकेच दाब देऊन इस्त्री करुन घ्यावी. 

२. सुती कापड :- भरजरी कपड्यांना इस्त्री करताना सुती कापडाचा वापर करावा. यासाठी सुती कापड अंथरुन मग त्या कापडात इस्त्री गुंडाळून घ्यावी. अशा इस्त्रीने हेव्ही वर्क, एम्ब्रॉयडरी किंवा इतर नाजूक नक्षीकाम यांवर आपण सहजपणे इस्त्री करु शकतो. या एम्ब्रॉयडरी वर्कवर सुती कापड ठेवल्याने एम्ब्रॉयडरी वर्क आणि इस्त्रीचा लोखंडी पृष्ठभाग यांच्यामध्ये एक प्रकारचे अंतर निर्माण होते. यामुळे एम्ब्रॉयडरी वर्क खराब होत नाही. 

कंगना रे.. हातात घाला सुंदर कंगन! पाहा १० नवीन  डिजाईन्स, सण समारंभात हातांची वाढेल शोभा...

३. इस्त्री करण्याची योग्य पद्धत :- नाजूक व बारीक एम्ब्रॉयडरी असणाऱ्या कपड्यांना घरी इस्त्री करताना ते कपडे उलटे करून म्हणजेच आतली साईड बाहेर काढून इस्त्री करावी. यामुळे नाजूक कपड्यांना किंवा कपड्यांवरील एम्ब्रॉयडरी वर्कला इस्त्रीची थेट उष्णता लागत नाही. यामुळे नाजूक नक्षीकाम आणि एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपड्यांना अशा पद्धतीने इस्त्री करावी. 

४. कपड्यांवर जास्त दाब देऊ नका :- नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपड्यांना इस्त्री करताना अशा कपड्यांवर जास्त दाब देऊ नये. जेव्हा आपण कपड्यांवर जास्त दाब देऊन इस्त्री करतो तेव्हा असे कपडे खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपड्यांना इस्त्री करताना हलक्या हाताने इस्त्री करावी. 

मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस  गळतील - होईल नुकसान...

५. कापडावर इस्त्री ठेवून टेस्टिंग करा :- नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपड्यांना इस्त्री करताना, सर्वातआधी संपूर्ण कपड्याला इस्त्री करण्यापूर्वी फॅब्रिकच्या एका लहान विरुद्ध बाजूला थोडीशी इस्त्री फिरवून पहावी. असे केल्याने इस्त्रीचे तापमान त्या कापडासाठी योग्य आहे का अयोग्य ते तपासून पाहण्यास मदत मिळते.   

६. नाजूक कपड्यांना स्टिमिंग करु नये :- शक्यतो नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या कपड्यांना स्टिमिंग करु नये. नाजूक कपड्यांना स्टिमिंग केल्याने फॅब्रिक आणि धाग्यात ओलावा निर्माण होऊ शकतो. यामुळे एम्ब्रॉयडरी वर्कचे नुकसान होऊ शकते.


Web Title: Ironing Hack : A step by step guide to iron your embroidered outfits at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.