कमीत कमी वेळेत स्वयंपाक कसा करता येईल असा प्रश्न गृहिणींसमोर रोजचा असतो. त्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाचे नियोजन हे दिवसाच्या सुरुवातीपासूनच सुरु होते. (is cooking in pressure cooker healthy) वेळ आणि गॅसची बचत करण्यासाठी स्वयंपाकघरात कुकरचा वापर केला जातो. स्वयंपाकघरातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेशर कुकर. (pressure cooker destroy nutrients) प्रत्येक स्वयंपाकघरात याचा सरार्स वापर केला जातो. ज्यामुळे आपली कामं सोपी होतात आणि वेळही वाचतो. जर तुमच्याकडे प्रेशर कुकर नसेलच तर जेवण बनवणे किती अवघड होईल याची कल्पना देखील करणे कठीण होईल. अनेकदा अॅल्युमिनियम आणि स्टील कुकर यापैकी कोणता कुकर निवडावा हा प्रश्न गृहिणींच्या समोर असतो.
बाजारात प्रेशर कुकरचे अनेक नवीन प्रकार आले आहेत. ज्यामुळे जेवण अधिक काळ गरम राहाते किंवा पदार्थ लगेच शिजतो. परंतु, अनेकांना असे वाटते की, प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवल्याने पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे ते पातेल किंवा भांड्यात जेवण बनवणे पसंत करतात. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने पोषक तत्व नष्ट होतात का? याबद्दल जाणून घेऊया फिटनेस कोच राल्स्टन डिसोझा यांच्याकडून.