ढोल किंवा डिजेचं म्युझिक एन्जॉय करत जोपर्यंत दणकेबाज डान्स होत नाही, तोपर्यंत लग्नसोहळा कसा अपूर्ण, अर्धवट वाटतो. एकदा का पाय थिरकायला लावणारं म्युझिक सुरू झालं की मग माहोल जमून येतो आणि सगळेच वऱ्हाडी जमेल तसा, झेपेल तेवढा डान्स करतात. यात नवरा- नवरीचा आणि त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींचा, भावंडांचा उत्साह अर्थातच बघण्यासारखा असतो. इथे या नवरीचंही (funny dance by a bride) तेच झालं. उत्साहाच्या भरात तिने जो काही डान्स केला तो पाहून तिथे उपस्थित सगळेच अचंबित झाले. (is she dancing or doing her regular exercise?)
आता लग्न म्हटलं की प्रत्येकाच्याच उत्साहाला उधाण आलेलं असतं. त्यात ज्यांचं लग्न असतं, त्या नवरा- नवरीच्या उत्साहाबाबत तर काही विचारायलाच नको. उत्साहाच्या भरात काय करू आणि काय नको असं त्यांना होऊन जातं.
"माझ्या असण्यावर माझं प्रेम आहे, कारण..." असं म्हणत मलायकाने दिला एक खास फिटनेस मंत्र
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या नवरीचंही काहीसं तसंच झालं आहे. लग्न, त्यामधलं नृत्य या सगळ्याच बाबतीत ती एवढी एक्सायटेड दिसत होती की त्याच नादात तिने चक्क डान्स करता करता व्यायाम करायला सुरुवात केली. weddinganswers या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
यामध्ये सुरुवातीला नवरी आणि नवरदेव दोघं सोबत डान्स करताना दिसत आहेत. आजुबाजुला सगळे वऱ्हाडी आहे. नवरी अतिशय उत्साहात एकदम दणकेबाज डान्स करत आहे.
झुरळं, पाली, माश्या, मुंग्या यामुळे वैतागलात? करून बघा १ सोपा उपाय, घर होईल स्वच्छ- चकाचक
त्यावेळचा तिचा ग्रेस खरोखरच बघण्यासारखा आहे. नृत्य करत करत ती एका खांबजवळ जाते आणि तिथे त्याला पकडून डबलबारप्रमाणे चक्क पुशअप्स करू लागते. तिचे पुशअप्स झाल्यानंतर नवरदेवही तेच करू लागतो. ते पाहून उपस्थितांना क्षणभर कळतच नाही की यांचा दोघांचा डान्स चालू आहे की व्यायाम, असा हा मजेशीर व्हिडिओ एकदा नक्की बघाच...