Join us  

एक्झॉस्ट फॅन कळकट - चिकट झालेत, साफ करताना नाकीनऊ येतात ? ६ टिप्स, ५ मिनिटात सफाई, फॅन चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 11:47 AM

Cleaning Hacks for Exhaust Fan एक्झॉस्ट फॅन साफ करायचं म्हटलं की महिलांना आधी घामच फुटतो. त्यातील चिकटपणा सहसा निघत नाही. काही टिप्स फॉलो करा, मिनिटात होईल काम.

जेवण बनवत असताना अनेक वेळा फोडणी देताना अथवा चपाती शेकताना घरात धूर हा होतोच. हा धूर बाहेर घालवण्यासाठी आपण घरात एग्झॉस्ट फॅन लावतो. घरातील उष्ण हवा, जेवण बनवताना झालेला धूर हे सर्व काही एग्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने हवा बाहेर फेकली जाते. कालातंराने एग्झॉस्ट फॅनवर तेलकट आणि चिकट थर साचण्यास सुरुवात होते. आपण नियमितरित्या एग्झॉस्ट फॅनला साफ ठेवत नाही. घरातील साफ सफाई करताना अथवा महिन्यातून आपण एग्झॉस्ट फॅनला साफ करतो. तोपर्यंत त्या एग्झॉस्ट फॅनवर तेलाचे चिकट थर बऱ्यापैकी साचतात. जे काढताना नाकीनऊ येतात. आपण एग्झॉस्ट फॅनवर साचलेली घाण काही घरगुती सोप्या पद्धतीने साफ करू शकता.

एग्झॉस्ट फॅन साफ करण्यासाठी टिप्स

- एग्झॉस्ट फॅन साफ करताना सर्वप्रथम तो पूर्णपणे बंद करा. त्याचे प्लग आणि वायर डिस्कनेक्ट करा.

- एक्झॉस्ट फॅनचे सगळे पार्टस वेगळे करा. एग्झॉस्ट फॅन साफ करताना मुख्य मेहनत ब्लेड्स आणि ग्रीसचे डाग काढण्यात लागते. त्यांना स्वच्छ करण्यासाठी गरम उकळत्या पाण्यात बेकिंग सोडासोबत २ कप अमोनिया टाकून त्याचे मिश्रण तयार करा.

- त्या पाण्यात वेगळे केलेले सगळे पार्टस टाका. ते सगळे पार्टस किमान अर्धा तास तरी मिश्रणात ठेवा.

- अर्धा तास झाल्यानंतर पार्टस पाण्यातून बाहेर काढा. आणि स्क्रबने चांगले घासून घ्या. 

- आपण एक्झॉस्ट फॅन साफ करण्यासाठी गरम पाणी आणि डिटर्जंटने बनवलेले मिश्रणाचा देखील वापर करू शकता. याने एक्झॉस्ट फॅन साफ करण्यास मदत मिळेल. 

- एक्झॉस्ट फॅनचे हट्टी आणि तेलकट डाग काढण्यासाठी आपण लिंबू, व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा देखील वापर करू शकता. याने एक्झॉस्ट फॅन चकचकीत निघेल.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी