Lokmat Sakhi >Social Viral > ईशा अंबानीचा ११ लाखांचा देखणा ड्रेस, फिरायला जाताना घातलेल्या ड्रेसची पाहा खासियत...

ईशा अंबानीचा ११ लाखांचा देखणा ड्रेस, फिरायला जाताना घातलेल्या ड्रेसची पाहा खासियत...

Isha Ambani's simple floral skirt and top come at a price tag that will blow your mind: ₹11 lakh : Isha Ambani Exudes Comfort And Elegance In A Simple Terracota Floral Print Top And Skirt Set : ईशा अंबानीच्या स्टाइल सेन्सची कायम चर्चा असते, तिनं घातलेला स्कर्ट टॉपही वेगळा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 18:12 IST2025-01-04T18:00:24+5:302025-01-04T18:12:49+5:30

Isha Ambani's simple floral skirt and top come at a price tag that will blow your mind: ₹11 lakh : Isha Ambani Exudes Comfort And Elegance In A Simple Terracota Floral Print Top And Skirt Set : ईशा अंबानीच्या स्टाइल सेन्सची कायम चर्चा असते, तिनं घातलेला स्कर्ट टॉपही वेगळा आहे.

Isha Ambani's simple floral skirt and top come at a price tag that will blow your mind: ₹11 lakh Isha Ambani Exudes Comfort And Elegance In A Simple Terracota Floral Print Top And Skirt Set | ईशा अंबानीचा ११ लाखांचा देखणा ड्रेस, फिरायला जाताना घातलेल्या ड्रेसची पाहा खासियत...

ईशा अंबानीचा ११ लाखांचा देखणा ड्रेस, फिरायला जाताना घातलेल्या ड्रेसची पाहा खासियत...

'अंबानी' असं नुसतं नाव जरी घेतलं तरी 'रॉयल' असच वाटत. देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असणारे अंबानी कुटुंबीय यांचा थाटमाट जरा भारीच असतो. नुकतेच मुकेश अंबानी यांचा लेक (Isha Ambani Exudes Comfort And Elegance In A Simple Terracota Floral Print Top And Skirt Set ) अनंत अंबानी याचा शाही विवाह सोहळा अगदी थाटामाटा पार पडला, या सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेला राजेशाही थाट संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अशाचप्रकारे अंबानी परिवारातील सगळेच सदस्य नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात(Isha Ambani's simple floral skirt and top come at a price tag that will blow your mind: ₹11 lakh).

नीता अंबानी यांचे साडी प्रेम आजवर सगळ्यांनीच पाहिले असेल, त्यांची साड्यांची चॉईस, निवड सगळं कसं अगदी चोखंदळ - पारखं करुन योग्य निवड करतात त्या साड्यांची. आईच्या याच पावलावर पाऊल ठेवत लेक ईशा देखील आपले कपडे, त्यांची निवड, चॉईस किंवा फॅशन, स्टाईल याबाबतीत अगदी स्वतः जातीने लक्ष देते. ईशा (Isha Ambani) नुकतेच तिची आई नीता अंबानी आणि त्यांच्या मित्रांसोबत आउटिंग एन्जॉय करताना दिसली. या आउटिंग दरम्यान ईशाने चक्क ११ लाखांचा ड्रेस घातला होता. एवढ्या महागड्या ड्रेसची खासियत नेमकी काय, त्यात काय विशेष आहे ते पाहूयात. 

ईशा अंबानीचा साधा पण हटके लूक होतोय व्हायरल... 

ईशाने Miu Miu चा लग्झरी आउटफिट परिधान केला आहे. यात स्कर्ट आणि ब्लाऊज असा सेट आहे. तिच्या या ड्रेसचे फोटो सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होताना दिसत आहे. फोटोत बघताना हा फारच साधासुधा ड्रेस वाटतो. कदाचित त्या ड्रेसकडे पाहून त्याची किंमत ११ लाख आहे यावर कुणाचा सहजासहजी विश्वास देखील बसणार नाही. 

हा हलक्या चॉकलेटी रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला स्कर्ट टॉप आहे.  या दोन्हींची किंमत खूप जास्त आहे. नक्षीदार सॅब्ली टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टॉपची किंमत $७,६०० डॉलर आहे. म्हणजेच भारतीय रुपयांत  ₹६,५१,९२४ इतकी आहे. तर स्कर्टची किंमत $६,३०० डॉलर आहे, जी अंदाजे ₹५,४०,४११ इतकी आहे. एकत्रितपणे या स्कर्ट टॉपची किंमत  एकूण ₹११,९२,३३५ इतकी आहे.  

पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट करा घरीच, होईल पैशांची बचत - केस होतील चमकदार...

नेमकं या ड्रेसमध्ये आहे तरी काय? 

ईशाचा सुंदर ड्रेस टेराकोटा कापडापासून तयार करण्यात आला आहे. या तिच्या स्कर्ट टॉपवर नाजूक फुलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. तिच्या टॉपची नेकलाईन गोलाकार आहे सोबतच हा टॉप फुल्ल स्लिव्ह्ज आहे. त्याखाली तिने त्याच कापडाचा सुंदर असा मिडी स्कर्ट घातला आहे. 

हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्या, कोरडी त्वचा? बस्स वाटीभर दही काफी है! पाहा खास उपाय...


उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट 'नीर चटणी' करा घरच्याघरीच, डोसे - वडे खा मनसोक्त...

नीता अंबानी यांची रॉयल साडी... 

नीता अंबानी यांनी डार्क नेव्ही ब्ल्यू रंगाची साडी नेसली होती. ज्यावर नाजूक चांदीच्या फुलांचे नक्षीकाम आणि किनार होती. त्यावर त्यांनी मॅचिंग सिल्क ब्लाउज, लेयर्ड नेकलेस, डायमंड कानातले आणि हातात एक शोभिवंत ब्रेसलेट आणि अंगठ्यां घातल्या होत्या. याचबरोबर त्यांनी त्यांच्या साडीला शोभेल असा मेकअप देखील केला होता. केसांचे साईड पार्टीशन, कपाळावर टिकली, ओठांवर हलकी लिपस्टिक असा साधा हलका मेकअप केला होता.

Web Title: Isha Ambani's simple floral skirt and top come at a price tag that will blow your mind: ₹11 lakh Isha Ambani Exudes Comfort And Elegance In A Simple Terracota Floral Print Top And Skirt Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.