आई होण्याचा अनुभव हा खूपच खास असतो पण काही महिला या गोष्टींचा गैरफायदा घेतात. अशीच एक घटना इडलीमधून समोर आली आहे. जिथे एक महिलेने जवळपास १७ वेळा गर्भवती होण्याचं नाटक करत कामावरून सुट्टी घेतली अखरे कधीना कधी सत्य सर्वांसमोर येतच. (Italy Women Faked About Getting 17 Times Pregnant to get off from Work And Maternity Benefits)
या पद्धतीने या महिलेची चोरी पकडली गेली. इटलीमध्ये राहणारी ही महिला ५० वर्षांची असून गेल्या २४ वर्षात तिने १७ वेळा गर्भवती होण्याचे नाटक केले आहे. या दरम्यान तिने मातृत्व अवकाश आणि सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांचा आनंद घेतला.
तब्बल १७ वेळा गर्भवती होण्याचे नाटक केले
महिलेनं सांगितले की आई होण्याची तिची ही सतरावी वेळ होती. ज्यातील १२ वेळा तिला गर्भपात करावा लागला. तिच्या पाच मुलांचे नाव बेनेडाटा, एंजेलिका, अब्रामो, लेटेजिया आणि इस्माईल असे आहेत. पण या महिलेकडे आपोल्या मुलांच्या जन्माबाबतचा कोणताही रेकॉर्ड नाही. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना शंका आहे की महिला इतक्यावेळा गर्भवती झाली नसून नेहमी गर्भवती असल्याचे इतरांना भासवत होती.
दरम्यान या महिलेने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या छोट्या मुलाला जन्म दिला ज्यानंतर पोलिसांचे या महिलेवर लक्ष होते. पोलिसांकडे पुरावा असूनही ही महिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्यास तयार नव्हती. महिलेवर ११०,००० युरोंचा फायदा घेतल्याचा आणि कामावरून सुट्टी मिळवण्यासाठी १७ वेळा गर्भवती राहण्याचे नाटक करण्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाखाली महिलेला जेलमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
एका वकीलाने दावा केला आहे या महिलेने मागच्या २० वर्षांच्या रोम क्लिनिकने जन्म प्रमाण दाखल्याची चोरी केली होती. अनेकदा तिने डॉक्टरांची खोटी सहीसुद्धा घेतली होती. ही महिला गर्भवती दिसण्यासाठी पोटाशी उशी ठेवत होती त्यानंतर स्लो चालत होती. जेणेकरून लोकांना कळेल की ती गर्भवती आहे. फसवणूक उघडकीस आल्यानंतर तिचा नवरा डेव्हिडने सांगितले की, २०१२ मध्ये त्यांचे नाते सुरू झाले तेव्हापासून ती गर्भवती होत गेली.