Join us  

ऐकावं ते नवलच! मुलाच्या एक्स गर्लफ्रेण्डशीच केलं वडिलांनी लग्न; प्रेमात पडले म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 1:36 PM

Father Married son's ex-girlfriend in America :एक्स ग्रलफ्रेंडच झाली मुलाची आई, वाचा अनोखी प्रेमकहाणी...

ठळक मुद्देवयाचे अंतर जास्त असल्याने सिडनी हिच्या घरातून या लग्नाला काहीसा विरोध होता. मात्र तिचे पॉल यांच्यावर मनापासून प्रेम असल्याने अखेर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.आपण अशाप्रकारे पॉल यांच्या प्रेमात पडू आणि लग्न करु असे मला स्वप्नातही वाटले नव्हते असे सिडनी म्हणाली.  

भारतात आजही कुटुंबव्यवस्था अस्तित्वात असल्याने आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करणे आणि त्याच व्यक्तीशी लग्न करणे असे केले जाते. अशाप्रकारे साधारणपणे एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा केले जाते. पण परदेशात नात्यांचे कोणतेच बंधन नसल्याने एकाहून अधिक लग्न करणे त्याठिकाणी अगदीच सामान्य आहे. पण अशातच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पत्नीपासून झालेली मुले सांभाळत आई-वडिलांना आपले नाते सांभाळावे लागते. (Weird love story) यामुळे अनेकदा काही घोळ होण्याची शक्यता असते. अमेरिकेतील ओहायो येथे नुकतीच अशीच एक घटना घडली असून हे ऐकून आपल्याला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. ही अजब प्रेमकहाणी वाचून कदाचित आपल्याही भुवया उंचावू शकतात (Father Married son's ex-girlfriend in America). 

(Image : Google)

त्याचे झाले असे की ओहायोमध्ये एका वडीलांचे आपल्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध जुळले. एकवेळ हे ठिक आहे पण या वडीलांनी या तरुणीशी लग्नही केले. म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड असलेली ही तरुणी आता या मुलाची आई म्हणून या घरात राहणार. या व्यक्तीचे वय ५१ असून ही तरुणी त्याच्यापेक्षा दोन चार नाही तर तब्बल २४ वर्षांनी लहान आहे. म्हणजेच आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणीशी हा व्यक्ती लग्न करत आहे. या तरुणीचे नाव सिडनी डीन असून आता ती २७ वर्षांची आहे. वयाच्या ११ व्या वर्षी ती लग्न झालेला व्यक्ती म्हणजेच पेशाने ट्रक ड्रायव्हर असलेल्या पॉलच्या मुलाला डेट करत होती. 

ती म्हणते आईवडिलांचे पैसे खर्च करणं हाच माझा जॉब! दिवसाला उडवते ४० लाख

(Image : Google)

पॉल यांच्या मुलाशी सिडनीचे ब्रेकअप झाले खरे, मात्र ती पॉल यांच्या कायम संपर्कात राहीली. पॉल यांचा मुलगा दुसऱ्या मुलीला डेट करत असल्याने आमच्यामध्ये ब्रेकअप झाले असे सिडनीचे म्हणणे आहे. त्यावेळी मी पॉल यांच्याशी मेसेजवर बोलायचे. यादरम्यान वयाच्या १६ व्या वर्षी मी पॉल यांच्या प्रेमात पडले आणि अखेर ११ वर्षांनी आम्ही लग्न केले. वयाचे अंतर जास्त असल्याने सिडनी हिच्या घरातून या लग्नाला काहीसा विरोध होता. मात्र तिचे पॉल यांच्यावर मनापासून प्रेम असल्याने अखेर त्यांनी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात केले. आपण अशाप्रकारे पॉल यांच्या प्रेमात पडू आणि लग्न करु असे मला स्वप्नातही वाटले नव्हते असे सिडनी म्हणाली.  

आंटी म्हणत मोठ्या वयाच्या बायकांना टोमणे कसले मारता? शमिता शेट्टीसारखे अनुभव तुम्हालाही येतात..

टॅग्स :सोशल व्हायरलदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टलग्न