आपल्या मुलांनी मोठं होऊन खूप नाव कमवावं, समाजापुढे आदर्श राहील असं काम करावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. अनेक घरात परिस्थिती नसतानाही काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण दिलं जातं आणि मुलं त्याचं सोनं करताना दिसतात. उच्च पद मिळवण्यासाठी माणसांना खूप कष्ट करावे लागतात हे खरे आहे, पण जो माणूस पद मिळवल्यानंतरही नम्र राहतो, त्याचे व्यक्तिमत्त्व वेगळे दिसते. असे अनेक प्रशासकीय अधिकारी किंवा देशातील इतर अधिकारी लोकांसाठी उदाहरणे आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये एक IFS अधिकारी त्याच्या पालकांना कार्यालयात घेऊन गेला. (Jagdish bakan ifs officer with his farmer parents in office photo goes viral)
वास्तविक, हा फोटो स्वतः IFS अधिकारी जगदीश बाकन यांनी त्यांच्या हँडलवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की माझे पालक कधीही शाळेत जाऊ शकले नाहीत. माझे वडील छोटे शेतकरी होते पण, माझा चांगला अभ्यास व्हावा... मी गावातला पहिला इंजिनिअर बनावं नंतर पहिला सरकारी कर्मचारी आणि UPSC पास करणारा पहिला माणूस.... असं त्याचं स्वप्न होतं आणि माझ्या ऑफिसमध्ये ते आता पहिल्यांदाच आले आहेत.
या फोटोत पालकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. ते इतक्या नम्रपणे उभे आहेत की ते सगळ्यांनाच हा फोटो पाहून आनंद होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय वन सेवेचे अधिकारी जगदीश बकन 2017 च्या बॅचचे आहेत आणि सध्या ते तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये वन्यजीव वॉर्डन आणि डीएफओ आहेत.
या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे आई-वडील अतिशय साध्या कपड्यात दिसत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सांगते की, मुलाला यशस्वी झालेलं पाहून ते किती आनंदी आहेत. सोबत जगदीश उभे आहेत. त्याचे सुंदर ऑफिसही दिसत आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.