Join us  

जान्हवी कपूर सांगते- फक्त आईच्या 'त्या' इच्छेसाठी मी कितीही मोठी ऑफर धुडकावू शकते... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 1:23 PM

Janhvi Kapoor Reveals About Her Mother Sridevi: अभिनेत्री जान्हवी कपूर हिने तिची आई म्हणजेच श्रीदेवीच्या एका आवडत्या गोष्टीविषयीची माहिती नुकतीच एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. 

ठळक मुद्देएका मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवी यांच्याविषयीची एक खास आठवण सांगितली.

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून जान्हमी बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत आली आणि आता ती तिथे बऱ्यापैकी स्थिरस्थावरही झाली आहे. जान्हवीचा 'उलझा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमांत जान्हवी सहभागी झाली होती. त्यावेळी तिने बऱ्याच मुलाखतीही दिल्या. त्यापैकी एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवी यांच्याविषयीची एक खास आठवण सांगितली. त्यामध्ये ती म्हणाली की आईला आवडणारी 'ती' एक खास गोष्ट तिच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे..(Janhvi Kapoor Reveals About Her Mother Sridevi)

 

आपलं माणूस जेव्हा आपल्यासोबत असतं तेव्हा त्याच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करतच असतो. पण दुर्दैवाने जेव्हा ती व्यक्ती आपल्याला कायमची सोडून जाते, तेव्हा मात्र त्या प्रिय व्यक्तीच्या आवडत्या किंवा नावडत्या गोष्टी आपल्याला आणखी तिव्रतेने जाणवू लागतात.

केस अजिबातच वाढत नाही? लसूण तेल लावा! एवढे भराभर वाढतील की वारंवार कापावे लागतील 

अशीच श्रीदेवी बद्दलची एक आठवण जान्हवीने सांगितली आहे. जान्हवी म्हणते की तिच्या आईला तिचे केस खूप आवडायचे. त्यामुळे अगदी दर ४ दिवसांनी त्या जान्हवीला मालिशही करून द्यायच्या. जान्हवीचा पहिला चित्रपट होता 'धडक'. या चित्रपटातल्या भुमिकेची गरज म्हणून जान्हवीने आईला न सांगताच केस कापले.

 

ते पाहून श्रीदेवी तिच्यावर खूप चिडल्या आणि इथून पुढे कोणत्याही भुमिकेसाठी केसांना कधीच कात्री लावायची नाही म्हणून तिला चांगलाच दम दिला. जान्हवी म्हणते ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील.

रात्री शांत झोप लागतच नाही- सारखी जाग येते? २ पदार्थ खा, छान झाेप होऊन सकाळी फ्रेश व्हाल

आईला माझे केस आवडायचे आणि ते मी जपणार आहे. मला कितीही मोठी भूमिका मिळाली तर मी ती संधी सोडून देईल पण त्या भुमिकेसाठी कधीही केस कापणार नाही. 'उलझा' या चित्रपटासाठी देखील तिला दिग्दर्शक सुधांशू यांनी केस कापायला सांगितले होते. पण जान्हवीने ते ऐकले नाही. त्यांचे त्यावरून बरेच वादही झाले पण तरीही ती केस कापायला तयार झाली नाही. जान्हवीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहण्यासाठी ती आता उत्सूक आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलजान्हवी कपूरश्रीदेवी