Lokmat Sakhi >Social Viral > इन आंखो की मस्ती के...रेखाच्या गाण्यावर जान्हवीचा डान्स पाहून नेटिझन्स झाले दिवाने.. पाहा व्हिडिओ

इन आंखो की मस्ती के...रेखाच्या गाण्यावर जान्हवीचा डान्स पाहून नेटिझन्स झाले दिवाने.. पाहा व्हिडिओ

गाण्याच्या बोलांप्रमाणे करत असलेले हातवारे आणि तिचे हावभाव अतिशय लक्षवेधक असल्याने नेटीझन्सनी तिचे या डान्ससाठी कौतुक केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 11:23 AM2022-05-02T11:23:06+5:302022-05-02T12:00:09+5:30

गाण्याच्या बोलांप्रमाणे करत असलेले हातवारे आणि तिचे हावभाव अतिशय लक्षवेधक असल्याने नेटीझन्सनी तिचे या डान्ससाठी कौतुक केले आहे.

Janhvi won the hearts of the audience with her catchy dance on Rekha's song; Watch the video | इन आंखो की मस्ती के...रेखाच्या गाण्यावर जान्हवीचा डान्स पाहून नेटिझन्स झाले दिवाने.. पाहा व्हिडिओ

इन आंखो की मस्ती के...रेखाच्या गाण्यावर जान्हवीचा डान्स पाहून नेटिझन्स झाले दिवाने.. पाहा व्हिडिओ

Highlightsधडक या चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून आता ती वरुण धवन सोबत बवाल या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने जान्हवीने शेअर केला व्हिडिओ

 अभिनेत्री जान्हवी कपूरसोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील काही ना काही गोष्टी ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच तीने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला असून तिच्या या डान्सवर तिचे चाहते फिदा झाले आहेत. हा व्हिडिओ जुना असून इंटरनॅशनल डान्स डेच्या निमित्ताने तिने हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. मात्र हा दिवस आपल्याकडून मिस झाला असून २ दिवस उशीरा आपण हा दिवस सेलिब्रेट करत असल्याचेही ती सांगते.

(Image : Google)
(Image : Google)

'उमराव जान' या नावाजलेल्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हीच्या 'इन आंखों की मस्ती के' या गाण्यावर तिने केलेल्या अदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरत आहेत. हा चित्रपट आणि रेखा यांची या चित्रपटातील भूमिका, गाणी हे सगळेच त्या काळात खूप गाजले होते. आजही ही गाणी तितकीच प्रसिद्ध आहेत. जान्हवीने अनेकांच्या जुन्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला आहे. घरातच जमिनीवर बसून जान्हवी हा डान्स करत असल्याचे दिसते. कॉटनचा क्लोलर प्रिंट असलेला अंब्रेला ड्रेस घालून जान्हवी अतिशय सिंपल पद्धतीने हे सादरीकरण करत असल्याचे दिसते. मात्र ती गाण्याच्या बोलांप्रमाणे करत असलेले हातवारे आणि तिचे हावभाव अतिशय लक्षवेधक असल्याने नेटीझन्सनी तिचे या डान्ससाठी कौतुक केले आहे. 

अशाप्रकारे बसून पहिल्यांदाच डान्स केल्याचेही जान्हवी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणते. अशाप्रकारचा डान्स करणे आपण मिस करत असल्याचेही ती सांगते. सगळ्यांना ती इंटरनॅशनल डान्स डेच्या शुभेच्छाही देते. सोशल मीडियावर जान्हवीचे फॅन फॉलोईंग मोठे असून एका दिवसांत २ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. इतकेच नाही तर ४ हजारांहून अधिक जणांनी तिच्या या डान्सचे कौतुक केले आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ बराच व्हायरलही झाला आहे. जान्हवी क्लासिकल डान्सचे शिक्षण घेत असून अनेकदा ती आपली ही कला सोशल मीडियाच्या माध्यमातून सादर करत असते. तिच्या आताच्या व्हिडिओवर मनीष मल्होत्रा, शनाया कपूर यांसारख्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोकांनीही तिच्या या डान्ससाठी तिचे कौतुक केले आहे. धडक या चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून आता ती वरुण धवन सोबत बवाल या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.

Web Title: Janhvi won the hearts of the audience with her catchy dance on Rekha's song; Watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.