Join us  

गोकुळाष्टमी: फक्त ५ मिनिटांत सजवा कान्हाचा पाळणा, डेकोरेशन इतकं सुंदर की नजर हटणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 11:54 AM

Janmashtami decoration ideas : कृष्ण जन्मासाठी बाजारात अनेक आर्टिफिशियल पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट उपलब्ध असतात. पण घरी स्वत: बनवलेला पाळणा देवाला जास्त प्रिय असतो.

जन्माष्टमीची (Krishna Janmashtami 2023) तयारी अनेक घरांमध्ये सुरू आहे. या दिवशी कृष्णाचा अभिषेक करून सजावट केली जाते. प्रत्येकाच्याच घरी लड्डूगोपाल म्हणजेच बाळकृष्णाची लहान मूर्ती असते. कृष्ण जन्माष्टमीसाठी बाजारात अनेक आर्टिफिशियल पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट उपलब्ध असतात. पण घरी स्वत: बनवलेला पाळणा देवाला जास्त प्रिय असतो. इंस्टाग्रामवर cozyyylilcorner या अकाऊंटवरून श्रीकृष्णासाठी  एक आकर्षक पाळणा तयार करण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

पाळणा बनण्याासाठी साहित्य

२ लहान  पॉट

एक मातीचे भाडं

लाकडाच्या छोट्या काठ्या - ३ 

दोरी 

मोती

सजावटीसाठी फुलं 

कृती

1) सगळ्यात आधी कुडींत रेती भरून घ्या. कापडाची लेस काठीवर गुंडाळा. आता दोन्ही भांड्यांमध्ये एक लहान काठी टाका. तिसरी काढी दोन्ही काठ्यांच्या टोकांना बांधा. मातीचे भांडे काही वेळ पाण्यात ठेवा आणि नंतर स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने चार छिद्र करा. या छिद्रांमध्ये दोरी बांधा आणि 

2) मातीचे भांडे कापडाने झाकून त्यावर बालगोपाल ठेवा. गोट्यानेही भांडी सजवा. साकोरमध्ये मोत्यांची एक तार बांधून बांधा, ती झुलायला उपयुक्त ठरेल.

3) पॉट फुलं आणि मण्यांनी सजवा. बाल गोपाळासाठी एक सुंदर पाळणा तयार आहे. आता जन्माष्टमीला या पाळण्यावर कृष्णाला बसवून तुम्ही पूजा करू शकता.

टॅग्स :जन्माष्टमीभारतीय उत्सव-सण