Lokmat Sakhi >Social Viral > एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ

एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ

Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : या तरुणीने आपल्या मधुर आवाजात एका मराठी गाण्याचे सादरीकरण करत पुणेकरांना भलतेच खूश केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 04:30 PM2022-09-13T16:30:41+5:302022-09-13T16:32:59+5:30

Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : या तरुणीने आपल्या मधुर आवाजात एका मराठी गाण्याचे सादरीकरण करत पुणेकरांना भलतेच खूश केले.

Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : Are you scared alone?- Japanese girl performed Marathi song in Pune Ganeshotsav, watch the video | एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ

एकटी एकटी घाबरलीस ना?- जपानी तरुणीनं पुण्याच्या गणेशोत्सवात सादर केलं मराठी गाणं, पाहा व्हिडिओ

Highlightsएखादी भाषा समजून घेऊन त्यामध्ये सार्वजनिकरित्या सादरीकरण करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाहीसुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी तिच्या गाण्याचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे जगभरात गाजणारा उत्सव असतो. मानाच्या गणपतींपासून ते पुण्याच्या विविध भागांतील गणेशमंडळांद्वारे केले जाणारे देखावे, सादरीकरण, याठिकाणी रंगणाऱ्या मैफिली यांची जगात चर्चा होते. यावर्षीही तब्बल दोन वर्षांच्या गॅपनंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने तो अनेकार्थांनी खास होता. त्यामुळे अतिशय उत्साहाने शहरातील आणि शहराबाहेरील लोक या उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पुण्यात आवर्जून आल्याचे दिसले. गणेशोत्सव किंवा भारतीय संस्कृती पाहण्यासाठी परदेशी नागरीक कायमच भारतात येतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तर विसर्जन मिरवणुकांमध्ये या नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात अशाच एका परदेशी मुलीची जोरदार चर्चा झाली (Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video). 

याचे कारण म्हणजे मूळ जपानी असलेल्या या तरुणीने आपल्या मधुर आवाजात एका मराठी गाण्याचे सादरीकरण करत पुणेकरांना भलतेच खूश केले.  या गायिकेचं नाव आहे इरोहा सू (Iroha Sue). रोटरी एक्सचेंज प्रोग्रॅम (Rotary Exchange Program) च्या माध्यमातून ही तरुणी पुण्यात आली. यावेळी पुण्यातल्या शीला कोपर्डे ह्यांनी तिला हे गाणं शिकवलं आणि तिने गणेशोत्सव कार्यक्रमात ते गायलं. "एकटी एकटी घाबरलीस ना?" हे गाणं गाताना इरोहा त्या गाण्याचा अर्थ समजून घेऊन ते गात असल्याचे दिसते. शीला कोपर्डे या करिश्मा सोसायटीमध्ये राहत असून हा कार्यक्रमही सोसायटीचाच असल्याचे आपल्याला या व्यासपीठाच्या बॅनरवरुन दिसते. 

सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांनी तिच्या गाण्याचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यावेळी त्यांनी अतिशय भावनिक अशी कॅप्शन देत शीला कोपर्डे यांचे आभार मानले आहे. ते म्हणतात, संगीत सगळ्या सीमा ओलांडून हृदयापर्यंत पोहोचतं ह्याचं हे उदाहरण पाहून भरून आलं ...शुभंकर ने गायलेल्या या गाण्याला गेल्या वर्षी radio Mirchi चा " SONG OF THE DECADE " पुरस्कार मिळाला. वेगळ्या भाषेतील व्यक्ती जेव्हा मराठी बोलते किंवा एखादे सादरीकरण करते तेव्हा त्यांचा टोन, भाषा उच्चारणाची पद्धत सुरुवातीला काहीशी मजेशीर वाटते. पण अशाप्रकारे एखादी भाषा समजून घेऊन त्यामध्ये सार्वजनिकरित्या सादरीकरण करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. हे सादरीकरण सुरू असताना उपस्थितांकडून तिला मिळत असलेला प्रतिसादही आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकू येतो. 

 

Web Title: Japanese Girl Sing Song In Pune Ganpati Festival Saleel Kulkarni Post Viral Video : Are you scared alone?- Japanese girl performed Marathi song in Pune Ganeshotsav, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.