Lokmat Sakhi >Social Viral > जपानने तयार केले नवे हवा हवाई जॅकेट, आता ऊन लागले तरी फिरा बिन्धास्त...

जपानने तयार केले नवे हवा हवाई जॅकेट, आता ऊन लागले तरी फिरा बिन्धास्त...

Japanese turn to wearable tech to beat the heat : उष्णतेवर मात करण्यासाठी जपानमध्ये तयार करण्यात आले पंखे असलेले व घालण्यायोग्य जॅकेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 08:53 PM2023-08-19T20:53:03+5:302023-08-19T21:05:58+5:30

Japanese turn to wearable tech to beat the heat : उष्णतेवर मात करण्यासाठी जपानमध्ये तयार करण्यात आले पंखे असलेले व घालण्यायोग्य जॅकेट...

Japanese wear clothes with built-in fans to beat the heat as temperatures soar to record high. | जपानने तयार केले नवे हवा हवाई जॅकेट, आता ऊन लागले तरी फिरा बिन्धास्त...

जपानने तयार केले नवे हवा हवाई जॅकेट, आता ऊन लागले तरी फिरा बिन्धास्त...

उन्हाळा हा असा ऋतू आहे की सहसा कोणाला फारसा आवडत नाही. उन्हाळ्यात होणारी गर्मी, उष्णता, गरम वातावरण यामुळे नको जीव होतो. वातावरणातील उष्णता व वाढते तापमान यामुळे उन्हाळा सगळ्यांनाचं नकोसा वाटतो. उष्णतेचे वाढते प्रमाण याचा फटका जगभरातील अनेक देशांना झाला आहे. इतर देशांप्रमाणेच सध्या जपानमध्ये देखील उष्णतेचे प्रमाण वाढत जात आहे. जपानमधील लोकांसाठी यंदाचा जुलै महिना हा गेल्या १०० वर्षांतील सर्वात उष्ण तापमान असलेला महिना होता. या वाढलेल्या उष्माघाताने जपानमधे ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास ५०,००० लोकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज भासली होती.

या वाढलेल्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी जपानच्या वर्कमन कंपनीने एका नव्या, आगळ्यावेगळ्या जॅकेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वर्कमन ही बांधकाम कामगारांसाठी कपडे बनवणाऱ्या कंपनीपैकी एक आहे. काम करताना बांधकाम कामगारांना भरपूर कष्टाचे काम केल्याने घाम येतो. अशावेळी त्याच्या सोयीसाठी फॅन-फिट केलेल्या जॅकेटची निर्मिती करण्यात आली होती. या जॅकेटमध्ये एक नाहीतर चक्क दोन फॅन बसवले आहेत. जेणेकरून सतत येणाऱ्या घामापासून स्वतःचा बचाव केला जाऊ शकले(Japanese wear clothes with built-in fans to beat the heat as temperatures soar to record high).

या हवाई जॅकेटविषयी अधिक... 

रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीद्वारे चालणारे दोन इलेक्ट्रिक छोट्या गोलाकार आकाराचे पंखे जॅकेटच्या मागील बाजूस बसवलेले आहेत. हे पंखे वातावरणातील बाहेरील हवा शोषून घेऊन मग थंड हवा पुरवण्याचे मुख्य काम करतात. यामुळे जॅकेट परिधान करणार्‍याच्या शरीरावर थंड हवेचा झोत सोडला जातो. हे जॅकेटस जपानमध्ये १२,००० ते २४,००० येन इतक्या किरकोळ किंमतीत विकली जातात.  

‘तिला’ लागली लॉटरी, ऑनलाइन गाडी बूक केली, भाडं किती तर फक्त ६ रुपये ? हे कसं झालं ?

अमेरिकन महिलेचा आगळावेगळा विश्वविक्रम...आपल्यातील कमीपणा ठासून सांगत केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...

"बाहेरील वातावरण हे अधिकाधिक उष्ण होत जात असताना, ज्या लोकांनी यापूर्वी कधीही पंखा असलेले कपडे घातले नाहीत. तसेच जे उष्णतेने हैराण झाले आहेत व या वाढत्या उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कायम गारवा वाटण्यासाठी काहीतरी पर्याय शोधात आहेत, अशा लोकांना हे खरेदी करण्यात अधिक रस वाटतो".

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

लिपस्टिक लावण्याची आलिया भटची अजब पद्धत, रणबीर कपूर म्हणाला पुसून टाक ते...

वर्कमनचे प्रवक्ते युया सुझुकी यांनी एएफपीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. यासोबतच ते म्हणाले, “तुम्ही घरी पंख्याखाली असताना जसे तुम्हाला थंड वाटते, तसेच फक्त (जॅकेट) घातल्याने तुम्हाला थंड वाटते कारण तुमच्या शरीराच्या आसपासच्या भागातून सतत वारा वाहत असतो, यामुळेच तुम्हाला थंड वाटते."

Web Title: Japanese wear clothes with built-in fans to beat the heat as temperatures soar to record high.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.